'ते थुंकतील, लंघूशंका करतील', कुंभमेळ्यातील गैर-हिंदूंच्या दुकानांवर महंत पुरी यांची कठोर भूमिका

MahaKumbh Mela 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याच्या आयोजन जोरात तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत रवींद्र पुरी यांनी महाकुंभ-2025 मध्ये गैर-हिंदूंना दुकाने लावू देण्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कार्यक्रमाची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्यासाठी गैर-हिंदूंना दूर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महाकुंभाच्या संदर्भात महंत रवींद्र पुरी यांनी चिंता व्यक्त केली की, गैर-हिंदूंना चहा आणि ज्यूसची दुकाने उघडण्यास परवानगी दिली तर त्यामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, "आम्ही सांगितले आहे की, त्यांना चहाची दुकाने, रसाची दुकाने आणि फुलांची दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये. जर त्यांना ही दुकाने दिली तर ते थुंकतील आणि लंघूशंका करतील आणि आमच्या नागा संतांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल".

MahaKumbh Mela 2025

13 जानेवारी 2025 रोजी महाकुंभ सुरू होणार आहे. उपस्थितांना स्वच्छ वातावरण आणि सुरक्षितता मिळावी यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयागराजच्या पायाभूत सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

गैर-हिंदूंना दूर ठेवणे महत्त्वाचे

येथे महंत रवींद्र पुरी म्हणाले की, जर अशी घटना घडली आणि कोणी जखमी झाले तर संपूर्ण जगात चुकीचा संदेश जाईल. पुरी म्हणाले, "आमची मेळा सुंदर, स्वच्छ, भव्य, दिव्य आणि शांततापूर्ण असावा, कार्यक्रमाची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्यासाठी गैर-हिंदूंना दूर ठेवणे महत्त्वाचे आहे.

काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात ऐक्याचे आवाहन केल्यानंतर पुरी यांचे वक्तव्य आलं आहे. कुंभमेळ्याला भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदींनी लोकांना सामाजिक विभाजन आणि द्वेष संपवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान यापूर्वी, अखिल भारतीय मुस्लिम जमातने अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या महाकुंभाच्या वेळी गैर-हिंदूंना खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्यास मनाई करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता, असा युक्तिवाद केला होता की, अशा हालचालीमुळे समाजात फूट पडेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+