Mahakumbh 2025: संगम नाक म्हणजे काय? चेंगराचेंगरी कुठे झाली, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित खास गोष्ट
Mahakumbh 2025 Stampede: आज मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या प्रयागराज येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हा अपघात 'संगम नाक परिसरात' घडला आहे. याठिकाणी लोक सकाळी लवकर पवित्र स्नान करण्यासाठी जात होते. त्यावेळी अचानक गर्दी वाढल्यामुळे ही घटना घडली आहे. संगम नाक हे असे ठिकाण आहे, जिथे यमुना नदी आणि माँ सरस्वती एकत्र येतात, जी अदृश्य अवस्थेत राहते. असं म्हटलं जाते की या ठिकाणी स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात.

साधू आणि संत या ठिकाणी सर्वाधिक स्नान करतात. यावेळी महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन त्याचा परिसर वाढविण्यात आला आहे. पूर्वी येथे 50 लोकांसाठी आंघोळीची व्यवस्था होती, पण आता दररोज 2 लाख लोक तिथे आंघोळ करू शकतात पण एवढं काटकोर नियोजन असूनही अचानक गर्दी वाढल्यामुळे आज ही एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
मुख्यमंत्री योगी काय म्हणाले?
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, यावेळी महाकुंभात मोठी गर्दी आहे. प्रयागराजमध्ये सुमारे 8 ते 10 कोटी भाविक उपस्थित आहेत आणि काल सुमारे 5.5 कोटी लोकांनी स्नान केलं आहे. तर पंतप्रधान मोदींनीही चार वेळा फोन केला आहे आणि ते या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
माध्यमांशी बोलताना योगी म्हणाले की, संगम नाक्याकडे भाविकांची मोठी गर्दी सुरू होती, त्यामुळे दबाव वाढला. दरम्यान प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान आखाडा मार्गावरील बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविक गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचारांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षित स्नानासाठी प्रशासन सतत काम करत आहे.
भाविकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये
मुख्यमंत्री योगी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील सतत परिस्थितीचा अहवाल घेत आहेत. प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात आहे, पण गर्दी अजूनही प्रचंड आहे. विविध आखाड्यांच्या संतांनी विनम्रपणे विनंती केली आहे की भाविकांनी प्रथम पवित्र स्नान करावे आणि गर्दी कमी झाल्यावर आखाडे पवित्र स्नानासाठी जातील. संगम नाक, नाग वासुकी मार्ग आणि संगम मार्गावर खूप गर्दी असते. भाविकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री योगी यांनी केलं आहे.
भाविकांना संगमाकडे जाण्याची गरज नाही: मुख्यमंत्री योगी
'संपूर्ण कुंभ परिसरात घाट बांधण्यात आले आहेत. भाविकांना संगमाकडे जाण्याची गरज नाही.' भाविकांनी त्यांच्या जवळच्या घाटांवरच पवित्र स्नान करावे. आम्ही जखमींवर योग्य उपचार सुरु आहेत. भाविकांना ये-जा करण्याकरिता रेल्वेने प्रयागराज भागातील विविध स्थानकांवरून विशेष गाड्या चालवल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications