धक्कादायक! मुलाने गोळी झाडून वडीलांचा केला खून! ड्रममध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे, 'हे' आहे कारण

Lucknow crime pathology owner murder body found in drum : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आशियाना परिसरातून एक रक्ताचा थरार समोर आला आहे. येथील प्रसिद्ध 'वर्धमान पॅथॉलॉजी'चे मालक मानवेंद्र प्रताप सिंह यांची त्यांच्याच राहत्या घरात अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावर असलेल्या एका निळ्या रंगाच्या ड्रममधून मानवेंद्र यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह जप्त केला. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Lucknow crime

नेमकी घटना काय?

मानवेंद्र सिंह हे २० फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, सेक्टर-एल मधील त्यांच्या घर क्रमांक ९१ मधून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी तपास केला असता, एका ड्रममध्ये मानवी अवयव आढळून आले. फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मुलानेच केला बापाचा खून?

पोलिसांनी संशयावरून मानवेंद्र यांचा मुलगा अक्षत, जो बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे, त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा अक्षत पोलीस खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्यानेच वडिलांवर रायफलने गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि काही भाग सदारोना गावाजवळ फेकून दिले, तर उर्वरित भाग घरातच ड्रममध्ये लपवून ठेवले.

हत्याकांडामागचे 'ते' गुपित!

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, वडिलांच्या रागावण्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांची हत्या केली, असे म्हटले जात आहे पोलिस चौकशीदरम्यान अक्षतने सांगितले की, तो बायोलॉजी विषयात बारावी उत्तीर्ण झाला आहे आणि चौकशीदरम्यान त्याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. वडिलांच्या दबावामुळे आणि नीटच्या तयारीसाठी रागावण्यामुळे घरात वारंवार भांडणे होत असल्याचे त्याने सांगितले.

कट आधीच रचला की रागाच्या भरात हे पाऊल उचलले?

अक्षतने दिलेल्या कबुलीत हत्येचे असे एक कारण समोर आले आहे, ज्याने शिक्षणाच्या दबावाखालील तरुण पिढीच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अक्षतने बायोलॉजीमधून १२ वी पूर्ण केली होती आणि त्याच्या पुढील वाटचालीवरून घरात मोठा वाद झाला होता. वडिलांची 'ती' एक सवय अक्षतच्या डोक्यात गेली आणि त्याने थेट वडिलांचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेवेळी मानवेंद्र यांची पत्नी गावात होती, तर मुलगी घरातच होती. तरीही इतके मोठे हत्याकांड घरात कसे झाले, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+