Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Lokmanya Tilak Jayanti 2025 : टिळकांना लोकमान्य पदवी कुणी बहाल केली? लाल बाल पाल म्हणजे कोण? वाचा

Lokmanya Tilak Jayanti 2025 : लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे नाव कुणीही विसरणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी आणि भारतीय असंतोषाचे जनक त्यांना म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक यांचे नाव केशव गंगाधर टिळक हे होते, त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला होता. लोकमान्य या पदवीने त्यांचा गौरव करण्यात आला होता. विशेष म्हणजे जेव्हा लाल-बाल-पाल असा उल्लेख होतो, तेव्हा त्यात टिळकांचाही उल्लेख असतो.

एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. लाल-बाल-पाल यांच्यातील ते एक महनीय व्यक्तिमत्व होते. कुशल राजकारणी आणि देशाभिमानीही ते होते, त्यांची महिला शिक्षणाविषयी आणि वर्णव्यवस्था याबद्दलचे मत तत्कालिन विचारवंत आणि महापुरुषांपेक्षा भिन्न होते. आज टिळकांचा जयंती याच दिवशी त्यांचा रत्नागिरीतील चिखली या गावी जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त लाल बाल पाल ते लोकमान्य पदवी यासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.

Lokmanya Tilak Jayanti 2025

टिळकांना लोकमान्य पदवी कुणी बहाल केली?

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हणले.[४]

लाल बाल पाल म्हणजे कोण?

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल, लाल म्हणजे लाला लजपत राय आणि स्वतः टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे होय.

लोकमान्य टिळकांच्या या प्रसिद्ध घोषणा

  • स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच
  • "धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही.
  • केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे.
  • पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणे
  • सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? (एका प्रसिद्ध लेखातील शिर्षक)
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+