Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केरळमध्ये भुसख्खलनात आतापर्यंत 184 जण ठार, 170 लोक बेपत्ता, बचावकार्य सुरुच

केरळ: केरळच्या वायनाड जिल्ह्यात काल पहाटे भूस्खलन झाल्यानंतर आतापर्यंत 184 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बेपत्ता आहेत, त्यांना शोधले जात असून बचावकार्य सुरूच आहे. दरम्यान, केरळमध्ये या घटनेने दोन दिवसांचा दुखवटा पाळला जात असल्याने केरळ विधानसभेत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

दरम्यान, वायनाडच्या चूरलमला येथे मदत आणि बचाव कार्य सुरू असून पुन्ह एक भुसख्खलन होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Kerala landslides 143 people have died so far  chances of another landslide

रेल्वे वाहतूक सुरक्षित

काल भूस्खलनामुळे खराब झालेल्या रुळांवर पोहोचण्यापूर्वीच खोंगसांगला जाणारी मालगाडी थांबवून भारतीय लष्कराच्या टेरिटोरियल आर्मी ऑफ स्पीअर कॉर्प्सच्या तुकड्यांनी जलद कारवाई करून संभाव्य आपत्ती टाळली. सतर्क गस्तीने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे रेल्वे वाहतूकीची सुरक्षितता निश्चित झाली.

दुसऱ्या दिवशीही बचावकार्य

टेरिटोरियल आर्मीच्या 122 इन्फंट्री बटालियनचे सैनिक बचाव कार्याच्या दुसऱ्या दिवसाची तयारी करत असलेल्या स्थानिक शाळेतील त्यांच्या तात्पुरत्या निवारामधून मेप्पडी, वायनाड येथील आपत्तीग्रस्त भागात पाहचले आहेत.

इमारतीत लोक अडकले असावेत

NDRF कमांडर अखिलेश कुमार म्हणाले, "... काल आम्ही मुंडक्काई गावातून जखमी झालेल्या पीडितांना वाचवले. कोसळलेल्या इमारतींमध्ये पीडित लोक अडकले असावेत अशी भीती आम्हाला वाटते.

निश्चित आकडा माहीत नाही

अखिलेशकुमार हेही म्हणाले की, काल रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही 70 लोकांना वाचवले, त्यानंतर आम्ही खराब हवामान आणि पावसामुळे थांबण्यासाठी... अनेक टीम काम करत असल्याने आम्ही मृतांचा अचूक आकडा सांगू शकत नाही, आम्हाला फक्त आमच्या टीमने बाहेर काढलेल्या मृतदेहांची माहिती आहे. लोकांना एका रिसॉर्टमध्ये आश्रय देण्यात आला आहे. आणि नदीच्या पलीकडे पाऊस सुरू असल्याने आणखी एक भूस्खलन होण्याची शक्यता आहे..."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+