आपल्या सैनिकांनी स्वतःच्या रक्ताने इतिहास लिहिला..कारगीलच्या विजयानंतर काय म्हणाले होते अटलजी? वाचा
मुंबई - कारगिल विजय दिवस म्हटलं कि अंगात रोमांच उभा राहतो काटाही येतो आणि विजयाचं स्फुरणंही चढतं. या विजयात प्रत्यक्ष रणांगणात तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जाऊन आले होते. या युद्धाच्या अनेक आठवणी आहेत. युद्ध जिंकल्यानंतर संसदेत काय म्हणाले होते अटलबिहारी वाजपेयी चला जाणून घेऊ.
दोन महिने चालले कारगील युद्ध
पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेकी भारतीय हद्दीत, विशेषत: कारगिल प्रदेशात घुसले. कारगीलच्या उंच शिखरावर हा संघर्ष सुरू झाला, ज्याचा उद्देश काश्मीर आणि लडाखमधील दुवा तोडणे आणि भारताला वाटाघाटी करण्यास भाग पाडणे हा होता.कारगिल युद्ध मे ते जुलै 1999 पर्यंत सुमारे दोन महिने चालले. या लढ्यात आपल्या जवानांनी रक्त सांडून लागले आणि विजय मिळवला.

मला अर्जुनाची आठवण होतेय..
अटलजी म्हणाले होते, महाभारताच्या मैदानात उभा असलेल्या अर्जुनाची आठवण मला होतेय , युद्ध होवो अथवा नाही हा प्रश्न नाही. कोणत्या स्थितीत युद्ध व्हायला हवे त्याची काही गरज आहे का..कि नाही हा चर्चेचा विषय आहे. देशात कुणालाच युद्ध व्हावे असे वाटत नव्हते. मी एक कविता लिहिली होती जंग ना होने देंगे आणि त्यानंतर कारगीलचे युद्ध झालं.
..तर माझ्याकडून देशावर अन्याय झाला असता
अटलजी संसदेतील आपल्या भाषणात म्हणाले होते की, देश तयार जर नसता आणि जंग ना होने देंगे या कवितेतच रममान झालो असतो तर देशासोबत मी मोठा अन्याय केला असे झाले असते. आपण शांततेचा संदेश घेऊन गेलो होते, त्यात यश मिळाले नाही. विचारले जाते की तुम्ही का गेले, हा प्रश्नच गहन गेलो नसतो तर आपण का जात नाही...गेले तर का गेले.पण मी सर्व पक्षांच्या नेत्यांना धन्यवाद देतो की, मी आधीच म्हटले की, ही राजकारणाची वेळ नाही.
शंभर कोटी जनतेचा विश्वास गमावला नव्हता
अटलजी म्हणाले होते, त्यावेळी आम्ही पाहीलं की आमच्या भुमीत पाकस्तानी घुसखोर पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेव्हा वायूसेनेला मैदानात उतरवण्यात कोणताही संकोच ठेवला नाही. पाकिस्तान हतबल झाला. ते समजत होते की, भारतात सरकार नाही. हंगामी सरकार आहे, जिथे जमीनीवर बसू तिथं कुणी विचारणारे नाही, कुणी हटवणारे नाही असे त्यांना वाटले होते. आमचे सरकारनं जरी लोकसभेत विश्वासमत गमावलं पण आम्ही देशाच्या शंभर कोटी जनतेचा विश्वास गमावलेला नव्हता.

..रक्ताने इतिहास लिहिला
अटलजी म्हणाले होते, आपल्याला यश मिळालं. विजय मिळाला तो वीर जवानाच्या प्रयत्न आणि पराक्रमामुळेच. कारगीलच्या टोकावर आपल्या सैनिकांनी आपल्या रक्ताने जो इतिहास लिहिला, येणाऱ्या पिढ्या याची प्रेरणा घेत राहील. येणाऱ्या पिढ्या या सैनिकांना वंदन करत राहतील.
हमारी विजय निश्चित है..
आमचा विजय निश्चित होता. आम्हाला शांतता हवी, हे जगाला माहित आहे ते जगाने पाहीलेही. आता जग हे पाहील की, शांतता आणि देशाच्या रक्षणासाठी आम्ही आमच्या शक्तीचाही उपयोग करु शकतो...युद्धाच्या निकालाबाबत माझ्या मनात कोणतेही किंतू, परंतु नव्हते. आपला विजय निश्चित होता आणि आपण विजयी होऊ हा विश्वास होता.
संसदेवरील हल्ल्यानंतर अटलजी काय म्हणाले होते?
देशाच्या अस्तित्वाला आव्हान दिलं गेलं होतं. आपल्या अस्मितेला आव्हान दिलं गेलं. संसदभवनच का..देशात अनेक ठिकाणं आहे. विचारपुर्वक संसदभवनालाच लक्ष्य केलं गेलं. स्वतंत्र्य भारताचे हृदय संसद आहे. ती देशाचे प्रतिनिधीत्व करते. सर्वांना सोबत नेण्याचा महान प्रयत्न संसद आहे. त्यावर हल्ला करा हे काम विचारपुर्वक केलं गेलं.
अटलजींची 'ती' कविता
एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते
पर स्वतन्त्र भारत का मस्तक नहीं झुकेगा
अगणित बलिदानो से अर्जित यह स्वतन्त्रता
अश्रु स्वेद शोणित से सिंचित यह स्वतन्त्रता
त्याग तेज तपबल से रक्षित यह स्वतन्त्रता
दु:खी मनुजता के हित अर्पित यह स्वतन्त्रता
इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो
चिनगारी का खेल बुरा होता है
औरों के घर आग लगाने का जो सपना
वो अपने ही घर में सदा खरा होता है
अपने ही हाथों तुम अपनी कब्र ना खोदो
अपने पैरों आप कुल्हाडी नहीं चलाओ
ओ नादान पडोसी अपनी आँखे खोलो
आजादी अनमोल ना इसका मोल लगाओ
पर तुम क्या जानो आजादी क्या होती है?
तुम्हे मुफ़्त में मिली न कीमत गयी चुकाई
अंग्रेजों के बल पर दो टुकड़े पाये हैं
माँ को खंडित करते तुमको लाज ना आई?
अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को
दुनिया में कायम रख लोगे, यह मत समझो
दस बीस अरब डालर लेकर आने वाली बरबादी से
तुम बच लोगे यह मत समझो
धमकी, जिहाद के नारों से, हथियारों से
कश्मीर कभी हथिया लोगे यह मत समझो
हमलों से, अत्याचारों से, संहारों से
भारत का शीष झुका लोगे यह मत समझो
जब तक गंगा मे धार, सिंधु मे ज्वार
अग्नि में जलन, सूर्य में तपन शेष
स्वातन्त्र्य समर की वेदी पर अर्पित होंगे
अगणित जीवन यौवन अशेष
अमरीका क्या संसार भले ही हो विरुद्ध
काश्मीर पर भारत का सर नही झुकेगा
एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते
पर स्वतन्त्र भारत का निश्चय नहीं रुकेगा












Click it and Unblock the Notifications