न्यायमुर्ती संजीव खन्ना यांनी घेतली भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
New CJI Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51 वे सरन्यायाधीश बनले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्यायमूर्ती खन्ना यांनी नुकतेच निवृत्त न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची जागा घेतली आहे. त्यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत राहील. 16 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या शिफारशीनंतर केंद्राने 24 ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्ती जाहीर केली.

न्यायमूर्ती खन्ना हे जानेवारी 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) चा वापर कायम ठेवणे आणि निवडणूक बाँड योजना असंवैधानिक घोषित करणे यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपवणारे कलम 370 हटवण्यालाही त्यांनी पाठिंबा दिला होता.
14 मे 1960 रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती खन्ना यांनी तीस हजारी न्यायालयात कायद्याचा अभ्यास केला आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. 1983 मध्ये ते दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील झाले. सुरुवातीला तीस हजारी जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालयात गेले. त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीत आयकर विभागासाठी वरिष्ठ स्थायी सल्लागार आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीसाठी स्थायी सल्लागार म्हणून ही त्यांनी काम केलं आहे.
#WATCH | Delhi: President Droupadi Murmu administers the oath of Office of the Chief Justice of India to Sanjiv Khanna at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/tJmJ1U3DXv
— ANI (@ANI) November 11, 2024
अनेक ऐतिहासिक निर्णयांचा भाग
न्यायमूर्ती खन्ना यांच्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे निवडणुकीत ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत त्यांची भूमिका. 26 एप्रिल रोजी त्यांनी एका खंडपीठाचे नेतृत्व केले ज्याने EVM फेरफारबद्दलची चिंता नाकारली आणि कागदी मतपत्रिकांवर परत जाण्याचे आवाहन नाकारले. त्यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications