Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jharkhand Assembly Election 2024 : RLDला झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणूक लढवायची भाजप डिल करेल का?

Jharkhand Assembly Election 2024 : भाजपसोबत युती करून लोकसभेच्या दोन जागा जिंकल्यानंतर केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या राजकीय मनसुबे जोरदार असल्याचं दिसत आहे त्यांचा पक्ष आरएलडीने भाजपच्या इशाऱ्यावर हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली नाही, पण जम्मू-काश्मीरमध्ये ते नशीब आजमावत आहे. चौधरी पुढील झारखंड विधानसभा निवडणुकांबाबतही पडताळणी करत आहेत.

राष्ट्रीय लोक दल (RLD) जम्मू-काश्मीरमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, येथे त्यांची भाजपशी युती नसून ते एकटेच लढत आहेत. पण, आता हा पक्ष नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या झारखंड विधानसभेची निवडणूकही लढवण्याचा विचार करत आहे.

Jharkhand Assembly Election 2024

झारखंडमध्ये निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबाबत आरएलडी गांभीर्याने विचार करत आहे, पक्षाचे सर्वेसर्वा जयंत चौधरी मंगळवारी रांचीला गेले, तिथे त्यांनी पक्षाच्या निवडणुकीच्या शक्यतांची चाचपणी करण्यासोबतच निवडणूक लढवण्याबाबतही चर्चा केली. ते भाजपसोबत युतीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार होते. यापूर्वी, आरएलडीचे राष्ट्रीय सचिव अनुपम मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या गटाने भाजपचे उपाध्यक्ष आणि झारखंडचे पक्ष प्रभारी लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्याशी निवडणूकपूर्व युतीबाबत चर्चा केली होती.

इंडिया आघाडीतून आरएलडी एनडीएमध्ये सहभागी

आरजेडीच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'चर्चा योग्य दिशेने जात आहे आणि आम्हाला सकारात्मक परिणामांची अपेक्षा आहे.आरएलडी हरियाणा विधानसभा निवडणुकीपासून दूरच राहिला आहे. तेव्हा हा पक्ष इंडिया आघाडीशी संबंधित होता, तेव्हा त्यांचे उमेदवार सुभाष गर्ग यांनीही राजस्थानच्या भरतपूर जागेवर विजय मिळवला होता. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वी जयंत चौधरी एनडीएमध्ये दाखल झाले.

एनडीएत राहून युपीत दोन जागी विजय

लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये राहून यूपीमध्ये 2 जागा जिंकणाऱ्या आरएलडीला हरियाणामध्येही विधानसभा निवडणूक लढवायची होती, परंतु भाजपच्या दबावामुळे ते तेथे निवडणूक लढवू शकले नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील आरएलडीने एनडीए आघाडीत राहून बागपत आणि बिजनौरच्या जागा जिंकल्या. यापूर्वी 2014 आणि 2019 च्या लोकसभा आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या पक्षाचा पराभव केला होता.

..म्हणून चौधरी एनडीएमध्ये आले

2022 मध्ये, सपासोबत युती करून त्याचा मोठा फायदा झाला आणि 9 जागा जिंकल्या. भारतरत्न मिळाल्यानंतर चौधरी चरणसिंग एनडीएमध्ये सामील झाले, परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने जयंत चौधरी यांचे आजोबा चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली, त्यानंतर ते पक्ष बदलून एनडीएमध्ये सामील झाले.

भाजप आणि काँग्रेसचा मतदानाचा पॅटर्न काय सांगतो?

जम्मू-काश्मीरमध्ये आरएलडी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहे, आरएलडीचे म्हणणे आहे की त्यांनी याआधीही एका जागेवर निवडणूक लढवली आहे, परंतु त्यानंतर त्यांनी आपले निवडणूक चिन्ह वापरले नाही. पक्षाच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार, 'आरएलडी त्यांच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर (हातपंप) निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यात पक्षाचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+