Jharkhand Assembly Election 2024 :PM मोदींकडून झारखंडला गिफ्ट! 83, 300 कोटीच्या प्रकल्पांची पायाभरणी
Jharkhand Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. एकीकडे निवडणुका तोंडावर आल्या असतानाच त्या डोळ्यासमोर ठेवत आता तिथे हे विकासप्रकल्पाचे गिफ्ट देण्यात आले आहे. हजारीबागमध्ये 83 हजार 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
पीएम मोदींचा 17 दिवसांतील दुसरा दौरा
पीएम मोदींचा 17 दिवसांतील हा दुसरा झारखंड दौरा आहे. यापूर्वी 15 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी जमशेदपूरला गेले होते. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश राज्याचा आणि विशेषतः आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणे हा आहे. मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यान 40 एकलव्य मॉडेल निवासी शाळांचे उद्घाटन केले आणि आणखी 25 शाळांची पायाभरणी केली. या शाळांच्या बांधकामासाठी 2,800 कोटी रुपयांहून अधिक बजेटची तरतूद करण्यात आली आहे.

पाच कोटी आदीवासींना फायदा
या शैक्षणिक उपक्रमांचा फायदा 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 549 जिल्ह्यांमधील 63 हजारहून अधिक गावांमध्ये आणि 2 हजार 740 ब्लॉकमधील आदिवासी विद्यार्थ्यांना होईल. याचा परिणाम पात कोटींहून अधिक आदिवासींच्या जीवनावर होणार आहे. यातून आदिवासी समुदायांना दर्जेदार शिक्षण देण्याची सरकारची वचनबद्धता दिसून येते. पीएम मोदी यांनी आबा जनजाती ग्राम उत्कर्ष मोहिमेचा शुभारंभ केला. ज्यांचे बजेट 79,150 कोटी रुपये आहे.
रस्ते पाणी, आरोग्य वीज, शिक्षणासाठी योजना
आदिवासी बहुल गावांमध्ये विकासाला गती देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या अभियानांतर्गत गावांमध्ये घरे, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या योजनेचा उद्देश आदिवासी समुदायांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करणे हा आहे.
आपल्या भाषणात स्वच्छ भारत मिशनच्या 10 व्या वर्धापन दिनावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत हे जगातील सर्वात मोठे सार्वजनिक अभियान आहे. 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणे आणि स्वच्छता पातळी सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. भारताला स्वच्छ आणि निरोगी राष्ट्र बनवण्यात या मिशनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हजारीबागमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते. 20 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही यात्रा सुरू केली होती आणि ती राज्यभरातील 81 विधानसभा मतदारसंघातून गेली आहे. झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा हा दौरा आहे. जे डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा आणि महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन हे राज्याच्या विकासासाठी आणि आदिवासी समाजाच्या भल्यासाठी असलेली त्यांची वचनबद्धता दर्शवते. राजकीय दृष्टिकोनातूनही ही भेट महत्त्वाची आहे. कारण झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून सर्वच पक्ष आपापली रणनीती बनवत आहेत.












Click it and Unblock the Notifications