Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आदिवासी धर्मांतर-घुसखोरावरून भाजप खासदार रवी किशन यांनी हेमंत सरकारला घेरले

BJP Parivartan Yatra 2024: झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून भाजपाने सत्ताधारी हेमंत सोरेन सरकारला कोंडीत पकडत आहे. गोरखपूरचे खासदार आणि फिल्मस्टार रवी किशन आज बुधवार 25 सप्टेंबर रोजी पंकी विधानसभेत भाजपच्या परिवर्तन यात्रेत सामील झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हेमंत सरकारवर रवी किशन यांनी जोरदार निशाणा साधला. परिवर्तन महासभेला संबोधित करताना रवी किशन म्हणाले की, येथे असंख्य घुसखोर येत आहेत, पण भाजपचे सरकार आल्यानंतर घुसखोरांना हुसकावून लावले जाईल, असं रवी किशन म्हणाले. येथे धर्मांतर करून आदिवासी समाजाची संख्या बदलली जात आहे. असंख्य घुसखोर इथे येत आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर घुसखोरांना हाकलले जाईल, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितले.

ravi kishan

रवी किशन म्हणाले "संपूर्ण झारखंडमधून नालायक आणि फसव्या हेमंत सरकारला उखडून काढण्याचे वातावरण येथे दिसत आहे. "हे लोक आणखी किती काळ भ्रष्टाचार करत राहणार, त्यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा निघाली आहे. हे भ्रष्ट सरकार उखडून टाकले पाहिजे.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदिवासींसाठी काम करत आहेत. त्यांनी एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती केले आहे. आमचे सरकार गरिबांचे सरकार आहे, आम्ही देशातील गरिबांना घरे देण्याचे काम केले आहे. मात्र येथील हेमंत सरकार केवळ गरिबांच्या पैशाची लूट करत आहे अशी टीका रवी किशन यांनी केली.

भाजपच्या परिवर्तन यात्रेचा सहावा दिवस

भाजपच्या परिवर्तन यात्रेचा आज सहावा दिवस आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 20 सप्टेंबरला सुरुवात केली होती. ही यात्रा झारखंडच्या 81 विधानसभा मतदारसंघातून जाणार असून 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबरला हजारीबागमध्ये परिवर्तन यात्रेचा समारोप करणार आहेत. पंतप्रधान मोदी येथे जाहीर सभेला संबोधित करून परिवर्तन रॅलीचा समारोप करतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+