दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृ्त्यू, Cm फडणवीस यांच्याकडून घटनेचा निषेध
Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळ येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला बाइसरन घाटीमध्ये झाला असून त्याची जबाबदारी दहशतवादी संघटना TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) ने घेतली आहे. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या अधिका-यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत व्यक्तीचे नावे आहेत. तर जखमींपैक के एस बालचंद्र आणि मुंबईचे सोभित पटेल जखमी आहेत.
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. हा हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी सुमारे 3 च्या सुमारास करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर गोळीबार सुरू केला, ज्यामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले.

हल्लेखोरांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षादलांनी घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
TRF या दहशतवादी संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
TRF या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेला लष्कर-ए-तैयबा (LeT) चा एक भाग मानले जाते. हल्ल्यामागील उद्देश काश्मीरमधील पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणे असल्याचे काश्मीरचे नेते अल्ताफ ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, "पाकिस्तानला काश्मीरमध्ये पर्यटन वाढू द्यायचे नाही. हा हल्ला स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि अमरनाथ यात्रेवर परिणाम करणारा आहे." या हल्ल्याने काश्मीरमधील शांतता प्रक्रियेला धक्का पोहोचला असून, दहशतवाद्यांचा हेतू स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवणे असल्याचे दिसते.
नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित लोकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल... त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल." असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहीती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "अतिशय भ्याड प्रकारचा हा हल्ला आहे. कुठे तरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक जात आहेत. हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हा हल्ला आहे. पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कोठेही मागे वळून पाहणार नाहीत. अश्या ज्या नालायक शक्ती आहेत. ज्यांचा भारताला मुकाबला करता येतो.
देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतली आहे. गृहमंत्री देखील तेथे पोहोचत आहेत. मी स्वत : जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली आहे". आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत. तर जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्यात येत आहे.
🕣 8.30pm | 22-4-2025📍Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/ipzc2VY25N
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. मी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि धिक्कार करतो. खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नाव विचारुन समोर गोळ्या घातल्या आहेत. खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा निषेध करता येईल तो थोडाच आहे.
काश्मीर हे नंदवन आहे. येथे पर्यटक पर्यटनासाठी जातात. अशा प्रकारचा भ्याड हल्ला करुन दहशतवाद्यांनी जे नीच कृत्य केलं आहे. माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे. त्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. मोदींनी देखील निषेध केला आहे आणि त्यांनी स्वत: देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे. ते काश्मीरमध्ये पोहोचतील. मला विश्वास आहे की अॅक्शनला रिअॅक्शन होईल. या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपले सैनिक घेतली. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याल करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
◻️LIVE | 🗓️ 22-04-2025
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 22, 2025
📍 मुंबई
📹 पत्रकारांशी संवाद
https://t.co/DGiBBwN1yn












Click it and Unblock the Notifications