जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षेत होणार मतदान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन हजार जवान तैनात
Jammu And Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक विधानसभा जागेसाठी सरासरी 2 ते 3 हजार सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी प्रथमच देशातील विविध राज्यांतील पोलिसांचे सशस्त्र दलही तैनात करण्यात आले आहे. सुरक्षेत कोणतीही अडचण येऊ नये. त्यासाठी तिप्पट संख्याबळ घेऊन निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक ड्युटीसाठी सुमारे 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये निमलष्करी दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश आहे. कर्तव्य बजावण्यासाठी सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रे देण्यात आली आहेत.

दहशतावादाने प्रभावित 7 जिल्ह्यांत होणार मतदान
पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, अनंतनाग, शोपियान, कुलगाम, रामबन, किश्तवाड आणि डोडा या 7 जिल्ह्यांतील 24 जागांवर मतदान होणार आहे. या 24 जागांमध्ये पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, झैनापोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, देवसर, डोरू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा बिजबिहार, शांगस अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंद्रावल, किश्तवार, पहेलगाम यांचा समावेश आहे. - नागसेनी, भदरवाह, डोडा, दोडा पश्चिम, रामबन आणि बनिहाल यांचा समावेश आहे. या सर्व जागा दहशतवादाने प्रभावित झाल्या आहेत.
पोलिसांचे सशस्त्र दलही तैनात
या जागांसाठी उभारण्यात आलेली मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आणि संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार या राज्यांच्या पोलिसांचे सशस्त्र दलही तैनात करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागेवर सुमारे 1 हजार ते 1500 सुरक्षा दल होते. तर यावेळी ३ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काश्मीरच्या आयजी विधि कुमार यांनी सांगितले की, निवडणुकीची पूर्ण तयारी सुरू आहे. सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. पुरेसे सुरक्षा दल तैनात आहे.
भाजपचे विरोधकांवर आरोप
भाजप आणि विरोधी पक्षांनी या निवडणूकीत एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. भाजपने विरोधी पक्षांना देशद्रोही असल्याचे सांगितले आहेत. काश्मीरला पुन्हा दहशतवादाच्या हवाली करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications