उमर अब्दुल्लांना वेगळंच टेन्शन, पहा जम्मू-काश्मिरच्या निकालात काय आला ट्विस्ट
जम्मू काश्मिरच्या निकालानंतर लोकांच्या जनाधाराविरोधात काही षडयंत्र व्हायला नको, असे स्पष्ट मत नॅशनल काँन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. मंगळवारी जम्मू काश्मिरचे निकाल येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी उमर अब्दुल्ला यांनी ही शंका व्यक्त केली. पहिल्या निकालात नँशनल काँन्फरन्स विरोधी भाजपपेक्षा खूप पुढे आहे. निकालाचा कल पाहिल्यानंतर अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भाजपने काही जुगाड करायला नको
निकालाचा कल नँशनल काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट दिसत असला तरी अब्दुल्ला म्हणाले की, जे काही होईल त्यात पारदर्शीता असायला हवी. जे काही होईल ते पारदर्शी होईल. जनाधार ज्या बाजूने असेल, त्या बाजूनेच सरकार यायला हवे. भाजपने जनाधाराविरोधात कोणतेही चाल खेळू नये. भाजपने सत्तेसाठी काही जुगाड करु नये, असेही उमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने लोकांच्या भावनांचा आदर करायला हवा. आम्ही काँग्रेससोबत जम्मू-काश्मिरमध्ये १०० टक्के सरकार बनवू. दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. आम्ही जिंकणारच आहोत फक्त बाकीचं अल्लाच्या हाती सोपवलं आहे.
पीडीपीच्या पाठिंब्यावर केलं वक्तव्य
उमर अब्दुल्ला म्हणाले की, "आम्ही आत्तापर्यंत कुणालाही पाठिंबा मागितला नाही व आम्हाला कुणीही पाठींबाही दिलेला नाही. निकाल येऊ द्या. आत्ताचे आकडे पाहिले तर आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला आत्ता कुणाच्याच समर्थनाची गरज नाही. निकाल आल्यानंतर आम्ही विश्लेषण करू." जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली आहे. तर पीडीपी आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली आहे.












Click it and Unblock the Notifications