Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकचे नुकसान किती, 5 विमानं कशी पाडली; IAF चीफ यांनी सगळंच सांगितलं!

भारतीय हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी शनिवारी 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशाची महती गायली. या ऑपरेशनमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले, असून त्यांची ५ लढाऊ विमाने पाडली. एपी सिंह यांनी बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात याची पुष्टी केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांच्या तळाचे उपग्रहाने घेतलेले फोटोही सादर केले.

एपी सिंह यांनी सांगितले की, "आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अप्रतिम काम केले आहे. आम्ही नुकतीच खरेदी केलेली एस-४०० प्रणाली गेम-चेंजर ठरली. पाकिस्तानकडे लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब होते, परंतु आमच्या मजबूत हवाई संरक्षणामुळे ते त्यांचा वापर करू शकले नाहीत."

Indian Air Force Chief AP Singh

एपी सिंह यांच्या भाषणातील प्रमुख पाच मुद्दे..!

पाकिस्तानी विमाने पाडली

या ऑपरेशनमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली. त्याचबरोबर, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस (AEW&C/ELINT) हे पाकिस्तानी पाळत ठेवणारे विमान सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून पाडण्यात आले. जमिनीवरून हवेत लक्ष्य मारण्याचा हा एक नवा विक्रम आहे.

दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त

एअर चीफ मार्शल म्हणाले की, पाकिस्तानमधील बहावलपूरमधील हल्ल्यापूर्वीचे आणि नंतरचे फोटो सर्वांसमोर आहेत. दहशतवाद्यांच्या तळावर काहीही शिल्लक राहिले नाही. हे फोटो उपग्रहाने घेतले होते, तसेच स्थानिक माध्यमांनीही उद्ध्वस्त इमारतींचे आतून फोटो दाखवले.

राजकीय स्वातंत्र्य

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. हवाई दलाला पुढे किती जायचे, याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. तिन्ही दलांमध्ये उत्तम समन्वय होता आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदाचा यात मोठा फरक पडला.

९० तासांत पाकिस्तानची माघार

एपी सिंह यांनी सांगितले की, हे एक हायटेक युद्ध होते, जे ८० ते ९० तास चालले. भारतीय हवाई दलाने इतके मोठे नुकसान केले की पाकिस्तानला याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि चर्चा करण्याची मागणी केली, जी भारताने स्वीकारली.

बालाकोटच्या 'भूता'पासून सुटका

२०१९ मध्ये बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता, त्यावेळी पुरावे सादर करता आले नव्हते, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, यावेळी आम्ही बालाकोटच्या त्या भूताचा सामना करू शकलो आणि जगाला आम्ही काय साध्य केले, हे दाखवू शकलो, असे त्यांनी सांगितले.

एपी सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये विजय मिळाल्यानंतर माझ्या काही जवळच्या लोकांनी 'अधिक मारायला हवे होते' असे म्हटले. पण, एकदा आपले उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर युद्ध थांबवणे योग्य होते आणि देशाने तो योग्य निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+