पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला होता! वेळ आल्यास पुढच्या मिशनसाठी सज्ज! भारतीय लष्कराची घोषणा
India pakistan war marathi news Indian army ready for next mission : आपले सैन्य आणि सर्व ठिकाणे सुरक्षित आहेत, पण जर वेळ आली तर आम्ही पुढच्या मिशनसाठी सज्ज आहोत अशा इशाराच भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला. तसेच पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला होता म्हणूनच ऑपरेशन सिंदूर राबवले असेही भारतीय लष्कराने म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. ही युद्धबंदी 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून लागू झाली आहे. मात्र,पाकिस्तानच्या कुरापती सुरुच होत्या. काल 11 मेपासून आज 12 मे सकाळपर्यंत मात्र भारतीय हद्दीत आणि काश्मीरात शांततेची परिस्थिती होती असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते. त्यानंतर आज दुपारी अडीचदरम्यान भारतीय लष्कराने वार्ताहर परिषद घेत युद्धबंदी झाल्यापासून, भारतीय लष्कर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती देत आहे.

गरज पडली तर आम्ही पुन्हा मोहिमेसाठी सज्ज - भारतीय लष्कर
दरम्यान, लष्कराने म्हटले आहे की, आमचे सर्व लष्करी तळ सुरक्षित आहेत आणि गरज पडल्यास पुढील मोहिमेसाठी सज्ज आहेत. एकाअर्थी हा पाकिस्तानला निर्वाणीचा इशाराच भारतीय लष्कराने दिला आहे.
त्यांचे पापांचे घडे भरले होते - डीजीएमओ
भारतीय लष्करी मोहीमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, 'आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या हवाई संरक्षण कृतीला एका संदर्भात समजून घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत, दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत होते, आता आपल्या सैन्यासोबतच, निष्पाप लोकांवरही हल्ले होत आहेत.
2024 मध्ये शिवखोडी मंदिरात जाणारे यात्रेकरू आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममधील निष्पाप पर्यटकावरील हल्ला यानंतर पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला होता. आमचे दहशतवाद्यांवर अचूक हल्ले नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केले जात असल्याने, आम्हाला पूर्ण माहिती होती की पाकिस्तानचा हल्ला सीमेपलीकडूनही होईल, म्हणून आम्ही हवाई संरक्षण तयारी केली होती.
9-10 मे रोजी जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने आमच्या हवाई क्षेत्रांवर आणि लॉजिस्टिक्स प्रतिष्ठानांवर हल्ला केला तेव्हा ते या मजबूत हवाई संरक्षण ग्रिडसमोर अपयशी ठरले.
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, 'आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी होती, म्हणून आम्ही सात मे रोजी फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. दुःखाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले आणि या लढाईला स्वतःची लढाई बनवले. या परिस्थितीत, आमची प्रत्युत्तराची कारवाई अत्यंत आवश्यक होती आणि यामध्ये त्यांचे जे काही नुकसान झाले, त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.
सर्व लष्करी तळ सुरक्षित आहेत - एअर मार्शल
आमची हवाई संरक्षण यंत्रणा देशासाठी भिंतीसारखी उभी होती आणि शत्रूला त्यात प्रवेश करणे अशक्य होते. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, "मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छिते की आमचे सर्व लष्करी तळ आणि सर्व उपकरणे आणि प्रणाली कार्यरत आहेत आणि गरज पडल्यास त्यांच्या पुढील मोहिमेसाठी सज्ज आहेत.












Click it and Unblock the Notifications