रक्त अन् पाणी.. अणु हल्ल्यावर पाकिस्तानला PM मोदींचा लाल किल्ल्यावरुन उघड इशारा! वाचा ठळक मुद्दे
Independence Day 2025 PM Modi Speech : "आजचा भारत अणु हल्ल्याच्या धोक्याला घाबरत नाही''अणु हल्ल्याचा ब्लॅकमेल सहन करणार नाही' आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असे म्हणत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशबांधवांना संबोधन करत आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी
पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन इशारा दिला की, पहलगाम हत्याकांडाने संपूर्ण भारत संतापला आहे आणि या हत्याकांडाने (पहलगाम) संपूर्ण जग हादरले आहे, ऑपरेशन सिंदूर ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे, पाकिस्तानमधील विध्वंस इतका व्यापक आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि दररोज नवीन माहिती बाहेर येत आहे.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू - पंतप्रधान
आज १५ ऑगस्टलाच देशाच्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना आपण सुरु करत आहोत. आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत आहे. पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना पंधरा हजार रुपये मिळणार आहे. कंपन्यांनाही प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल.
#WATCH | PM Narendra Modi says, "....Entire India was outraged, and the entire world was shocked by such a massacre (Pahalgam)...Operation Sindoor is the expression of that outrage....Destruction in Pakistan is so massive that new revelations are being made every day and new… pic.twitter.com/UJyLAHyOOH
— ANI (@ANI) August 15, 2025
सिंदूर ऑपरेशनमुळे पाकिस्तान अजूनही धक्क्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला स्पष्ट संदेश देताना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचा उत्सव शक्ती आणि संकल्पाच्या प्रदर्शनात बदलला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अलीकडील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत, ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तान "अजूनही धक्क्यात आहे"
गुन्हेगारांना कल्पनेपलिकडे शिक्षा दिली- पीएम मोदी
पीएम मोदी म्हणाले, एक जलद आणि निर्णायक लष्करी प्रत्युत्तर म्हणजे सिंदूर ऑपरेशन आहे, ज्याने त्यांनी घोषित केले की गुन्हेगारांना "त्यांच्या कल्पनेपलीकडे" शिक्षा दिली. पीएम मोदींनी इशारा दिला की, भारत आता पाकिस्तानच्या "अणुबॉम्ब"मुळे घाबरणार नाही. या टिप्पणीने सीमापार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांच्या सरकारच्या कठोर भूमिकेला अधोरेखित केले.
धमक्यांसमोर झुकणार नाही- पीएम मोदी
तत्पुर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतात ऑगस्टच्या स्वच्छ आकाशात तिरंगा आणि ऑपरेशन सिंदूर ध्वज शेजारी फडकवत असताना, हा संदेश अविस्मरणीय होता भारत आपल्या शहीदांचा सन्मान करेल, आपल्या शत्रूंना चिरडून टाकेल आणि कधीही धमक्यांसमोर झुकणार नाही असे म्हटले आहे.
हेही वाचा : Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची पेट्रोल डिझेलबाबत मोठी घोषणा! मिशन सुरु करणार












Click it and Unblock the Notifications