Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची पेट्रोल डिझेलबाबत मोठी घोषणा! मिशन सुरु करणार
Independence Day 2025 PM Modi Speech : भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज पहाटेपासूनच राष्ट्रीय उत्सवाची देशभरात धू असून यंदाचा हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीने तयारी केली. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला. ते सध्या बोलत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज मिशन ग्रीननुसार, भारत अणुऊर्जेवर पुढाकार घेत आहेत. दहा नवे रिअॅक्टर गतीने काम करत आहेत. २०४७ पर्यंत भारत विकसित होईल हे ध्येय आहे. बदल ही निरंतर प्रक्रीया असून बदल करावेच लागतात. परमाणू ऊर्जेचे द्वार उघडले असून शक्तीशाली होत आहे.
पंतप्रधानांची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,आम्ही २०३० पर्यंत क्लिन एनर्जी ५० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत, हा संकल्प आम्ही पुर्ण केले, हे ध्येय आम्ही २०२५ च्या आतच साकारले. कारण विश्वाप्रती, निसर्गाप्रती आम्ही जबाबदार आहोत. पेट्रोल, डिझेल गॅससाठी लाखो करोडो रुपये खर्च होत असे पण आता आपण ऊर्जेवर स्वंयपूर्ण झालो आहोत, हा पैसा वाचत असून हा खर्च आत्मनिर्भरता आणि देशाला विकसित करण्यासाठी वापरत आहोत. समुद्रमंथन आम्ही पुढे नेत आहोत, आणि समुद्रातून तेल, नैसर्गिक साठे शोधण्यासाठी मिशन मोड तयार करत आहोत, नॅशनल डीप वाॅटर अॅस्पेरिशन मिशन आपण सुरु करत आहोत. ही महत्वपुर्ण घोषणा आहे.
मेड इन इंडियाचा नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शुभांशु शुक्ला यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. १४० कोटी भारतवासी २०४७ साली विकसित भारताचे संकल्प पुर्ण करणार आहे. या संकल्पासाठी भारत सर्व क्षेत्रात आधुनिक इकोसिस्टीम तयार करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण याद्वारे आत्मनिर्भर बनू. देशातील युवा, अभियंते, वैज्ञानिकांना, सरकारच्या विभागाला आवाहन आहे की, मेड इन इंडिया, फायटर जेटसाठी आपले इंजिन हवे असे म्हटले. आपण फार्मा सेक्टर, लस संशोधनात आपण अग्रेसर आहोत, आपले स्वतःचे पेटंट असावे, नवीन औषधी संशोधन असावे हे मानवजातीच्या कल्याणासाठी कामी येईल.
युपीआयचा जगात डंका
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाचे भाग्य बदलायचे असेल तर युवकांचे आणि सर्व क्षेत्रातील लोकांची मदत हवी. सध्याचे जग आयटीचे आहे. एआय ते सायबर सुरक्षा आणि सर्व आयटी क्षेत्राला हवे ते सारे आपले असावे हे ध्येय आहे. आपण जगाला युपीआयचा प्लॅटफाॅर्म दाखवला. रियल टाईम ट्रान्झेक्शनमध्ये ५० टक्के योगदान जगात भारताचे आहे. भारताचा पैसा बाहेर जाऊ नये यासाठी आपण आता स्वावलंबी बनवूया.
इव्हीचे युग, आपल्याच, बॅटऱ्या खतं हवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक खतासह भारतीय नवीन संशोधनात्मक खतांचा उपयोग आपण काळ्या आईला समृद्ध करुया. नवीन संशोधन करुन आपण आपले खतं तयार करुया. हे जग इव्हीचे आहे आपणच बॅटऱ्या तयार करायला हव्या, कारण आपले तरुण खूपच गुणवाण आहे त्यांच्या सामर्थ्यावर मला विश्वास आहे.
इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला कैक वर्ष लागली तब्बल दिडशे वर्षांपेक्षा जास्त इंग्रजांनी देशावर सत्ता गाजवली. या सत्तेविरुद्ध भारतीय शूर स्वातंत्र्यसेनानींनी लढा दिला आणि इंग्रजी सत्ता झुगारुन दिली. त्यांच्या बलिदानामुळे आजचा दिवस आपण पाहत आहोत. त्या सर्वांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार आहेत. हा रेकाॅर्ड होणार आहे. कारण आतापर्यंत काँग्रेसशिवाय अन्य पक्षाचे कोणतेही पंतप्रधान हा विक्रम करु शकले नाहीत.
#WATCH | Delhi | Red Fort all decked up for the 79th Independence Day celebrations today. PM Narendra Modi to address the nations from the ramparts of the Red Fort today
— ANI (@ANI) August 15, 2025
Posters and banners on Operation Sindoor also a part of the decorations here pic.twitter.com/kTEKIeKALw
आज सकाळी किती वाजता कोणता कार्यक्रम?
- सकाळी ७:३० वाजता - पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचतील.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांचे स्वागत करतील.
- सकाळी ७:३५ वाजता - राष्ट्रध्वज फडकवला जाईल.
- सकाळी ७:३७ वाजता - राष्ट्रसभा आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल.
- सकाळी ७:४५ वाजता - पंतप्रधानांचे भाषण सुरू होईल.
#WATCH | J&K | Indian Army showcases air defence system that shot down Pakistani drones during Operation Sindoor
— ANI (@ANI) August 15, 2025
(Visuals from LoC Tangdhar) pic.twitter.com/67a2b3yHDFपंतप्रधान मोदींच्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, ते म्हणाले "सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करत राहण्याची प्रेरणा देवो. जय हिंद!"












Click it and Unblock the Notifications