Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चक्क चितेच्या राखेने खेळली जाते 'ही' होळी, काय आहे' मसन होळीचा' इतिहास

Masan Holi 2025 : मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याच हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते, वृक्ष आपली सर्व जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतो तर अनेक झाडांना मोहर आलेला असतो.

फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. होळी म्हणजे रंगाचा, आशेचा सण, यावेळी अगदी सगळे रुसवे फुगवे दूर करून सर्व राग,मत्सर विसरून सगळेजण एकत्र येतात, पुन्हा नवी सुरवात म्हणून होळीकडे पाहिलं जात.

masan holi

आता होळीबाबत भाटिया पुराणात अनेक कथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगळ्या मान्यतेनुसार होळीचा सण साजरा केला जातो. पण आता महाकुंभाच्या भव्य स्नानांनंतर नागासाधु त्यांच्या शिव सोबत भस्माने होळी खेळणार आहेत. मसान होळीमध्ये वापरली जाणारी राख किंवा भस्म बहुतेकदा स्मशानभूमीतून आणि मृतांच्या जळालेल्या मृतदेहांपासून आणली जाते. हि होळी का खेळली जाते आणि यामागचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात सविस्तर...

चितेच्या राखेने होळी खेळण्याची हि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मसन होळी ही मृत्युवरील विजयाचे प्रतीक देखील मानली जाते. काशीमध्ये खेळल्या जाणाऱ्या मसन होळीला चिता भस्म होळी असाही म्हणलं जातं. ही होळी भगवान शिवाला समर्पित असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान भोलेनाथांनी मृत्युदेव यमराज यांना पराभूत केल्यानंतर अंत्यसंस्काराच्या राखेने होळी खेळली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी आणि मृत्यूवर जीवनाचा विजय दर्शवण्यासाठी मसन होळी खेळली जाते. मसन होळीचा उत्सव दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी, लोक अंत्यसंस्काराच्या चितेतून राख गोळा करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यासोबत होळी खेळतात.

याबद्दलची प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे कि, भगवान शिव आणि पार्वती यांनी त्यांच्या मिलनानंतर रंगभरी एकादशीला इतर सर्व देवतांसह हि होळी साजरी केली. पण या होळीपासून भगवान शिव यांचे भक्त असणारे इतर लोक म्हणजेच भूत,पिश्याच, या उत्सवात सहभागी होऊ शकले नाही म्हणून भगवान शिव यांनी मसन घाटावर जाऊन आनंदाने आणि उत्साहाने या सर्व भक्तांबरोबर भस्माच्या राखेने होळी खेळली. ही होळी म्हणजे अमर्याद स्वीकृती आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते.

मसान होळी फक्त काशीमध्ये चितेच्या राखेने खेळली जाते. या उत्सवात सर्व शिवभक्त नाचतात आणि गातात. चितेच्या राखेने वातावरण व्यापले असतानाही काशीचा मणिकर्णिका घाट हर-हर महादेवाच्या जयघोषाने गुंजतो. या दिवशी लोक एकमेकांना गुलालासह चितेच्या राखेने अर्पण करतात. असे केल्याने त्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात.

मसन होळी हि बनारसच्या स्मशानभूमी मणिकर्णिका घाटावर मोठ्या थाटामाटात खेळली जाते. ही होळी रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी खेळली जाते. भगवान शिव यांना राख खूप आवडते असे मानलं जात आणि म्हणूनच इथले लोक त्यांच्या आशीर्वादाच्या आशेने या दिवशी राखेने होळी खेळतात. पौराणिक मान्यतेनुसार रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला निरोप दिला आणि तिला कैलास येथे आणले. देवी पार्वतीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी भगवान शिवाचे भक्त चितेच्या राखेने होळी खेळत. या दिवशी सर्व देवी-देवता मसान घाटावर येतात आणि चितेच्या राखेने होळी खेळतात.

भस्म होळीच्या वेळी वाराणसीतील अनेक मंदिरे आणि आश्रमांमध्ये भाविक आणि पुजारी उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. मणिकर्णिका घाटाजवळील मसान मंदिरात एका भव्य आरती समारंभाने या उत्सवाची सुरुवात होते, ज्यामध्ये जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक म्हणून काम करणाऱ्या स्मशानभूमीतून गोळा केलेल्या राखेने भाविक शिवलिंगावर विधीपूर्वक अभिषेक करतात आणि वातावरण उत्साहाने भरते.

सुरुवातीला, मसान होळी फक्त तपस्वी, अघोरी आणि आध्यात्मिक लोकच साजरी करायचे जे तपस्वीपणाची एक विशिष्ट पातळी गाठलेले होते आणि काशीला वारंवार भेट द्यायचे. बाबा, नागा साधू आणि अघोरी हे एकमेव लोक होते जे मृतांच्या अस्थी विसर्जनासाठी मसान होळी खेळायचे . अघोरी आणि नागा साधूंनी स्वतःला भौतिक आणि सांसारिक गोष्टींपासून अलिप्त केलेलं असत आणि मोठ्या तपश्चर्येतून हे घडतं, म्हणून त्यांनाच मसान होळीच्या रूपात भगवान शिवासोबत होळी खेळण्याची परवानगी होती.

पण कालांतराने, मसान होळी हा एक ट्रेंड बनला आहे जो प्रत्येकजण साजरा करतो आणि उत्सुकतेने पाहतो आणि नंतर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड सुद्धा केले जातात. एकेकाळी खूप जवळचा आणि फक्त काही निवडक लोकांसाठी केला जाणारा हा समारंभ आता पर्यटकांना आणि प्रभावशाली लोकांना आकर्षित करण्याचं एक साधन बनला आहे. आता रंगभरी होळीनंतर काशीला हजारो लोक मसान होळीचा आनंद घेतात आणि आनंदाने एकमेकांवर राख ओततात आणि नंतर ते फोटो, व्हिडीओज जगासोबत शेअर करतात.

तर ही मसन होळी कोणी खेळू नाही, याच उत्तर अगदीच सोपं आहे, मसन होळी ही अश्या लोकांसाठी आहे ज्यांनी भौतिक सुखांचा त्याग केला आहे, ज्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे आणि ज्यांचा अघोरी आणि स्म्शान या गोष्टींशी संबंध आहे. सांसारिक गोष्टीत अडकलेल्या सामान्य लोकांसाठी ही होळी नाही

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+