Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video: सख्खे मुस्लिम भाऊ लष्करात, एक पहलगाम सर्च ऑपरेशनमध्ये शहीद; दुसऱ्याचे 'श्रद्धांजली' भाषण ऐकाच

जम्मू- काश्मिरमधील पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर अंधाधूंद गोळीबार केला. या प्रकारानंतर देश हादरला. त्यानंतर सरकार अँक्शन मोडवर आले. भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक व गोळीबार करणारे अतिरेकी, या सर्वांची शोधमोहिम सुरु झाली. त्याच दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात एका कारवाईदरम्यान हवालदार झंटू अली शेख शहीद झाले. यांच्यावर शनिवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवानाच्या भावाने याच अंत्यसंस्कारात केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

Muslim jawan martyred

इंडू अली शहीद

पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने अतिरेक्यांची शोधमोहिम सुरु केली. लष्कराला काही दहशतवादी जंगलात लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर झंटू अली शेख यांनी त्यांच्या टीमसह उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर अतिरेक्यांनी लष्करावर गोळीबार केला. या चकमकीत हवालदार झंटू अली शेख शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पश्चिम बंगाल येथील नादिया जिल्ह्यात पाठविण्यात आले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

भावाचे भाषण व्हायरल

शहीद झंटू अली शेख यांचे मोठे भाऊही लष्करात आहेत. आपल्या भावाच्या अंत्यविधीत रफीकुल शेख यांनी दिलेले भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आपल्या भावाला श्रद्धांजली वाहताना रफीकुल शेख म्हणाले की, सैनिकाला कोणताही धर्म किंवा जात नसते. जर कोणात हिंमत असेल तर सांगा की भारतीय सैन्य हे हिंदू आहे... सांगा की भारतीय सैन्य हे मुस्लिम आहे... भारतीय सैन्य हे असे ठिकाण आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि पारशी एकाच ताटातून जेवतात. एकाच भांड्यात अन्न शिजवतात. जर तुम्हाला बंधुता पहायची असेल तर सैन्यात भरती व्हा... असं म्हणत रफीकुल शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाषणाची होतेय चर्चा

आपल्या भावनिक भाषणात रफिकुल शेख यांनी उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, माझा भाऊ आता या जगात नाही. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्याच्या कुटुंबाचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही, परंतु मला त्याहूनही अभिमान आहे की माझ्या भावाने या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी आपले जीवन अर्पण केले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू बांधवांची हत्या केल्याचे तुम्ही ऐकले असेल. त्या हिंदूं बांधवांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझा भाऊ एका पथकासह जंगलात गेला. तो सर्वात पुढे होता आणि अल्लाहच्या मनात जे होते, ते झाले...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+