Haryana Assembly Election 2024 : भाजपने खेळाडूंना संपवले - राहुल गांधी, हुडा-शैलजा एका व्यासपीठावर
Haryana Assembly Election 2024: जशी-जशी हरियानाच्या निवडणुकाची तारीख जवळ येत आहे तशी तशी निवडणुकीतील रंगत वाढत आहे. आज 26 सप्टेंबर रोजी,राहुल गांधींनी प्रचारफेरी काढली. यामध्ये त्यांनी भाजपवर टीका केली आणि भाजपने खेळाडूंना संपवल्याचा आरोप केला आहे,
राहुल गांधी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील असंध आणि हिस्सार जिल्ह्यातील बरवाला येथे रॅलीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि सिरसाच्या खासदार कुमारी शैलजा यांनाही एका व्यासपीठावर आणले हे विशेष.
असंध येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी खेळाडूंना भाजप संपवत असल्याचं म्हटलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा द्या. त्यानंतर आम्ही राज्यात दोन लाख सरकारी नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.
राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
असंधच्या निवडणूक सभेत केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी म्हटलं की, केंद्र सरकार फक्त 90 लोक चालवत आहेत. त्यापैकी फक्त 3 दलित आहेत. याउलट 45 दलित असायला हवे होते. हरियाणात काँग्रेसचे सरकार येणार आहे. हे सरकार संपूर्ण हरियाणाच्या जनतेचे राहील.
संविधान वाचवण्यासाठी लढा
राहुल गांधी यांनी काँग्रेसचा लढा फक्त हरियाणा वाचवण्यासाठी नसून संपूर्ण भारताला वाचवण्यासाठी असल्याचे सांगितले. संविधान वाचवण्यासाठी. भाजपच्या राजवटीत संविधान धोक्यात आले आहे. भाजपने सर्व संस्था आरएसएसच्या ताब्यात दिल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
एकाच खोलीत 15-20 लोक झोपतात
राहुल गांधींनी अमेरिकेत हरियाणातील तरुणांची भेट घेतल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.ते म्हणाले की, अमेरिकेतील टेक्सास दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मला सांगण्यात आले होते की, मी इथल्या हरियाणातील तरुणांना भेटावे. तिथे त्यांनी माझ्याशी एक व्हिडिओही शेअर केला. तुम्हाला हरियाणा समजून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा असं राहुल गांधी यांना सांगण्यात आलं.
हरियाणातून सुमारे 20 हजार लोक अमेरिकेत जात आहेत. त्यानंतर मी अमेरिकेत राहणाऱ्या हरियाणातील लोकांना भेटलो आणि मला कळले की ते एकाच खोलीत 15-20 लोक झोपतात. अमेरिकेत येण्याबाबत विचारले असता, 35 लाख रुपये देऊन इतर देशांतून येथे पोहोचल्याचे त्याने सांगितले. शेती विकून पैशाची व्यवस्था केली आहे.













Click it and Unblock the Notifications