Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'पापा ने वॉर रुकवा दी' ते जागतिक शांतता निर्माता PM मोदी युक्रेन अन् रशियात कसे संतुलन साधताहेत वाचा

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक डावपेचांमुळे भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाचा देश म्हणून स्थान आणखी वाढले आहे. मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेनच्या दौऱ्याने, तीन दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या भेटीमुळे फक्त भारतातील चर्चेलाच उधाण आले नाही तर परस्परविरोधी जागतिक शक्तींमध्ये एक संतुलन राखण्याची त्यांची क्षमता देखील दिसून आली आहे.

भारताने आयोजित केलेली जी-20 शिखर परिषद असो किंवा सहा आठवड्यांच्या अंतराने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील दौऱ्यात भेटीगाठी असो, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत असलेले भारताचे ऐतिहासिक संबंध आणि या समतोल कृतीने या युद्धजन्य संघर्षाच्या काळात दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्षमतेबद्दल अधिक आशा निर्माण झाल्या आहेत.

Russia Ukraine War PM Modi Becomes Pacemaker Congress Stops Talks International Marathi News

(पहिल्या छायाचित्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत आणि दुसऱ्या छायाचित्रात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत)

राजकीय धोरण

भारताचे रशियाशी असलेले संबंध शीतयुद्धाच्या काळापासूनचे आहेत, सोव्हिएत युनियन हा भारताचा घनिष्ठ मित्र होता त्यावेळी 1971 मध्ये स्वाक्षरी केलेला भारत-सोव्हिएत शांतता, मैत्री आणि सहकार्य करार हा दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या घनिष्ठ संबंधांचा पुरावा आहे. रशिया हा एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे, जो अनेक दशकांपासून भारताला लष्करी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करत आहे. तर दुसरीकडे, युक्रेन, सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, विशेषत: संरक्षण, शिक्षण आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये भारतासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदार देश आहे.

रशिया-युक्रेन संघर्षाच्या काळात या संबंधांत जोपासना आणि वृद्धी करणे हे एक मोठे आव्हान होते.अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी इतर राष्ट्रांवर दबाव आणला आहे, तर भारताने तटस्थ भूमिका कायम ठेवत संवाद आणि शांततेचा पुरस्कार केला आहे. रशियाला एकटे पाडण्यासाठी जो आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव सुरु होता त्याला झुगारुन या दबावाला बळी पडण्यास नकार देत पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संबंध ठेवणे सुरू ठेवले आहे. पाश्चात्य निर्बंधांना न जुमानता कच्च्या तेलाच्या खरेदीसह भारताच्या रशियाशी सुरू असलेल्या व्यावसायिक व्यवहारातून याचे उदाहरण समोर आले आहे.

Russia Ukraine War PM Modi Becomes Pacemaker Congress Stops Talks International Marathi News

भारताचे शांततेचे आवाहन

पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा हा भारताची शांततेसाठी बांधिलकी आणि सहभागी सर्व पक्षांशी संवाद साधण्याची इच्छा दर्शवण्याचे द्योतक होते. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत पंतप्रधानांचे जोरदार झालेले स्वागत पूर्व आणि पश्चिम राष्ट्रांतील दरी कमी करू शकणारे राष्ट्र म्हणून भारताचे वेगळे स्थान अधोरेखित करते. दोन्ही देशांत मोदींचे इतके उत्स्फूर्त स्वागत झाले ही वस्तुस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मिळालेला आदर दर्शवते.

सोशल मिडिया चर्चा: 'पापा ने वार रुकवा दी'..

मायदेशी परतल्यानंतर पीएम मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर सोशल मीडियातून एकच चर्चा सुरु झाली की, 'पापा ने वॉर रुकवा दी' (पापा ने युद्ध थांबवले) हे वाक्य लोकसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेत आले, यावेळेस मात्र, ते वाक्य "मोदीजी खरोखरच जागतिक नेते आहेत" आणि "शांतता निर्माता म्हणून भारताची स्थिती आता मजबूत झाली आहे" असे रुपांतरीत झाले आणि अशा कमेंटसह पीएम मोदींच्या समर्थकांनी त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांची प्रशंसा करण्यासाठी एक्स (आधीचे ट्विटर) या सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला.

तर दुसरीकडे टीकाकार मात्र साशंक आहेत. काहींनी प्रश्न केला आहे की मोदींच्या दौऱ्याचा ग्राऊंड लेव्हलवर काही ठोस परिणाम होईल का, "ही भेट फक्त जनसंपर्क वाढवण्याचा प्रय्न आहे का?" आणि "शांततेसाठी भारत कोणती ठोस पावले उचलत आहे?". असे सवालही आले पण एक गोष्ट स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी जे केले ते इतर कोणत्या राष्ट्रप्रमुखालाही जमले नाही. पुतिन आणि झेलेन्स्की या दोघांची अवघ्या काही आठवड्यांच्या कालावधीत घेतलेली भेट हे जागतिक शांतता निर्माता म्हणून भारताची भूमिका आणि स्थान मजबूत करते.

शांततेचा निर्माणकर्ता..

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबतचा संपर्कात राहणे, पीएममोदींचे प्रयत्न, संवाद आणि शांततेवर त्यांचा भर यामुळे भारताला या संघर्षात संभाव्य मध्यस्थ म्हणून स्थान मिळू शकते. भारताचे ऐतिहासिक सर्वसमावेशक धोरण, तटस्थतेच्या सध्याच्या भूमिकेसह, मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता देते. याव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव आणि रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या नेत्यांशी मोदींचे वैयक्तिक संबंध यामुळे भारताला दोन्ही बाजूंना वाटाघाटीच्या स्तरावर आणण्यात रचनात्मक भूमिका बजावता येईल.

भारताचे धोरणात्मक स्वातंत्र्य

मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल सांगायचे झाल्यास विशेषत: प्रभावीपण म्हणजे धोरणात्मक स्वातंत्र्य राखण्याची त्यांची क्षमता. रशियाशी भारताचे घनिष्ठ संबंध आणि आर्थिक गुंतवणुक असूनही, मोदी अमेरिकेच्या गुड बुक्समध्ये राहण्यात यशस्वी झाले आहेत. सध्याचे भू-राजकीय वातावरण लक्षात घेता हे संतुलन साधणे काही मोठा पराक्रम आहे, एका शक्तीशी जवळ गेल्यावर दुसरी शक्ती अनेकदा इतरांपासून दुरावते पण मोदींच्या मुत्सद्देगिरीमुळे भारताला पूर्व विरुद्ध पश्चिम या द्विपक्षीय संघर्षात न अडकता आपले सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हित जोपासता येत आहे.

विरोधकांची बोलती बंद

विशेष म्हणजे, या देशांतील मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना, विरोधक, विशेषत: काँग्रेस मात्र बहुतांशी मौन बाळगून आहेत. विशेषत: "पापा ने वार रुकवा दी" या घोषणेने लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आता त्यांचे बंद झालेले तोंड अर्थात मौन लक्षात घेण्यासारखे आहे. काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसतानाही जागतिक पातळीवर मोदी ज्या मुत्सद्दी मार्गाने चालत आहेत ही त्यांच्या क्षमतेची ओळख दर्शवते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+