बघा, गांधी परिवारात आतापर्यंत कुणाकुणाला मिळालय विरोधी पक्षनेतेपद?
नवी दिल्ली: 18 व्या लोकसभेत भाजपच्या नेतृत्त्वात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. संसदेच्या अधिवेशनात खासदारांना शपथ देण्यात आली आहे. तर इंडिया आघाडीच्या वतीने राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
राहुल यांना आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच अशी संधी मिळत आहे. ही मोठी जबाबदारी आणि संधी आहे. राष्ट्रीय राजकारणात चांगली पाडण्याचा राहुल गांधी निश्चितच प्रयत्न करतील. विरोधी इंडिया आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसच्या असल्याने विरोधी पक्षनेतापद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे.

गांधी परिवारातील तिसरा विरोधी पक्षनेता
जवळपास 10 वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळतो आहे. राहुल गांधी हे पद भूषवतील. मंगळवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांची काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने गांधी परिवारातील तिसरा व्यक्ती लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवेल.
यापूर्वी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. सोनिया यांनी 1999 ते 2004 या काळात ही जबाबदारी पार पाडली. तर 1990 मध्ये राजीव गांधी वर्षभर विरोधी पक्षनेते राहिले.
विरोधी पक्षनेता होण्यासाठी अट
संसदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी एखाद्या पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या किमान 10 टक्के म्हणजे 54 खासदार असणे गरजेचे आहे. त्यानुसार काँग्रेसचे 99 खासदार असल्याने काँग्रेसला ही संधी मिळत आहे.
यापूर्वी पुरेसे संख्याबळ विरोधकांकडे नसल्याने 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात हे पद रिक्त राहिले होते. आता विरोधकांचा आवाज मजबूत होणार आहे.
राहुल गांधी रायबरेली आणि वयनाडमधून जिंकले
54 वर्षाच्या राहुल गांधींनी यावेळी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली. दोन्ही मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर त्यांनी वायनडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. वायनाडमधून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवतील.
यापूर्वीचे विरोधी पक्षनेते
1969 मध्ये हे पद अस्तित्वात आले. त्यानंतर ही जबाबदारी पार पाडणारी काही प्रमुख आजी, माजी नेतेमंडळी पुढीलप्रमाणे, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, सुषमा स्वराज, गंगा देवी, राम सुभग सिंह, एम. स्टीफन, जगजीवन कदम, यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे.
त्यामुळे राहुल गांधी या ताकदीने जनतेचे प्रश्न मांडावे लागतील. ते पदाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Click it and Unblock the Notifications
