अग्नितांडव..! हैदराबादमधील चारमिनारजवळील भव्य इमारतीला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
Fire breaks in building near Hyderabad Charminar : हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार कॉलनीतील एका इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या अग्नितांडवात महिला आणि मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला. अजूनही अनेक लोक इमारतीत अडकलेले आहेत, त्यांचे बचावकार्य वेगात सुरू असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.
तेलंगणाचे मंत्री पन्नम प्रभाकर यांच्या मते, गुलजार हाऊस आगीतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, 'हैदराबादमधील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे खूप वेदना होत आहे. अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, 'या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

ही आहेत मृतांची नावे!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृतांची ओळख पटली आहे. अभिषेक मोदी (30), राजेंद्र कुमार (67), मुन्नीभाई (72), सुमित्रा (65), इरज (2 वर्षे), आरुषी जैन (17), हर्षाली गुप्ता (7 वर्षे) आणि शीतज जैन (37) अशी त्यांची नावे आहेत. बळींमध्ये दोन मुले आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
अचानक लागली आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत आग कशामुळे लागली याचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री खूप उष्णता होती आणि घरात बसवलेले सर्व एसी चालू होते. यामुळे घराचे वायरिंग गरम झाले असावे त्यामुळे वायरिंगला आग लागली आणि त्यातून निघालेल्या ठिणगीने काही वेळातच भयानक रूप धारण केले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आग इतक्या वेगाने पसरली की लोकांना बाहेर पळण्याची संधी देखील मिळाली नाही.
15 जणांना इमारतीच्या बाहेर सुखरूप काढले
पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत बचाव पथकाने 10 ते 15 लोकांना यशस्वीरित्या वाचवले आहे. स्थानिक आमदारांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि राज्य भाजप प्रमुख जी किशन रेड्डी, तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर हे देखील बचाव कार्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले.
याशिवाय, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित मंत्री पोन्नम प्रभाकर यांच्याशी बोलून घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. आगीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोनवरूनही संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी मंत्री प्रभाकर यांना आपत्तीमुळे बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले गेले आहे.












Click it and Unblock the Notifications