निर्मला सीतारामन 23 जुलैला सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प,जाणून घ्या बजेट कधी आणि किती काळ चालणार?
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी (6 जुलै) यासंदर्भात घोषणा केली असून 2024-25 वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे.

संसदेत अर्थसंकल्प मांडण्याआधी अधिवेशन 22 जुलैला सुरू होऊन 12 ऑगस्टला संपणार आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता त्या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या भारतीय सत्ताकाळाच्या इतिहासातील पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहे. मोरारजी देसाई यांनी यापूर्वी सलग अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन मागे टाकतील.
अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. मात्र या यावेळी भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेले नाही. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात करमुक्तीपासून पायाभूत सुविधांपर्यंत अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. मध्यम आणि पगारदार वर्गासाठी कर प्रणालीमध्ये बदल होईल ही मोठी आशा आहे. त्यामुळे त्यांच्या हातात अधिक उत्पन्न राहू शकेल.
अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाल्या होत्या राष्ट्रपती?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या 27 जून रोजी सुरु झालेल्या अधिवेशनात संसदेमध्ये अभिभाषण केले होते."अनेक ऐतिहासिक पावले" या अर्थसंकल्पातून उचलली जातील आणि सुधारणांचा वेग वाढेल असे आपल्या संयुक्त भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले होते. तसेच "भारतीय लोकांच्या जलद विकासाच्या आकांक्षांच्या अनुषंगाने सुधारणांचा वेग आणखी वाढवला जाईल." हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यातील दृष्टीचा प्रभावी दस्तऐवज ठरणार आहे. मोठ्या आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसोबतच अनेक ऐतिहासिक पावलेही या अर्थसंकल्पात पाहायला मिळतील असेही त्या म्हणाल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications