exit poll results 2024:हरियानात शेतकरी आंदोलनाचा फटका! BJPचे मिशन या 3 फॅक्टरमुळे फेल सत्ताही गमवणार
exit poll results 2024 : हरियाणात आज विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पुर्ण झाली आहे. सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतरच तेथील एक्झिट पोल हाती आले आहेत. बहुतांश सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियानात भाजपला मोठा फटका बसत असल्याचे आकडे समोर आले आहे. तिथे आता काँग्रेसचे सरकार बनेल असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
हरियानात सध्या भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे आहेत पण आता त्यांचे सरकार संपुष्टात येणार असून काँग्रेसचे सरकार येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण जवान, शेतकरी, कुस्तीगीरांनी ही निवडणूक हाती घेतली होती आणि त्याचे परिणाम एक्झिट पोलच्या रुपात आता दिसत आहेत.

Exit Poll Result 2024 नुसार हरियानात काँग्रेसची सत्ता
Matrize च्या मते 55 ते 62 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली. म्हणजेच 90 विधानसभा सीट असलेल्या हरियानात बहुमतासाठी 46 जागांची गरज असतानाच काँग्रेसचा 55 ते 62 जागांवर विजय सत्तास्थापनेकडे घेऊन जाणारा आहे.तर भाजप केवळ 18 ते 24 जागा मिळवू शकणार असल्याचं या पोलमध्ये म्हटले आहे. दैनिक भास्कर, पिपल प्लस, ध्रुव रिसर्च यांच्यामतेही काँग्रेस बहुमताच्या पुढे जाणार आहे.त्यामुळे आता काँग्रेसचा पंजा पुन्हा एकदा हरियानात सत्ता स्थापन करणार आहे.
भाजपचे मिशन फेल?
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर जेजेपीला 10 जागा मिळाल्या होत्या. आता या निवडणुकीत भाजपने 75 जागा जिंकण्याचे ध्येय राखले होते पण त्यांना एक्झिट पोलमध्ये केवळ 18 ते 29 च्या आतच जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपच्या पुन्हा सत्ता मिळवण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाईल अशी शक्यता आता आहे.
मुख्यमंत्री नायब सैनी यांचे वक्तव्य औटघटकेचेच...
एकीकडे भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री नायबसींह सैनी यांनी "आम्हाला जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत. हरियाणात कमळ फुलणार आहे असे म्हटले होते. त्यांची हि प्रतिक्रीया आज दुपारीच आली आहे पण त्यांच्या आशेवर आणि या महत्वकांक्षी वक्तव्यावर एक्झिट पोलने पाणी फिरवले आहे.
हरियाणात भाजपची पिछेहाट का होणार?
केंद्रातील मोदी सरकारने 2020 साली शेतकऱ्यांसंदर्भात तीन कृषि कायदे आणले होते. या कायद्यांना पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी कमालीचा विरोध केला होता. पण मोदी सरकारही जुमानले नाही. शेतकऱ्यांचे शंभु बाॅर्डवर वर्षभर आंदोलन चालले पण या कायद्यांची अमलबजावणीचाच सुर केंद्र सरकारचा होता. त्यामुळे पंजाबसोबतच हरियानाची जनताही केंद्रातील भाजप आणि स्थानिक भाजप सरकारवर नाराज होती. त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसल्याचे चित्र आहे.
शेतकरी आंदोलनाची किंमत मोजावी लागणार
शंभू बाॅर्डरवरील आणि त्या -त्या आसपासच्या प्रदेशात शेतकरी आंदोलन एवढे प्रभावी ठरले की, लोकसभेला 2019 वेळी हरियानात भाजपने पुर्णच्या पुर्ण दहा सीट्स जिंकल्या होत्या, पण यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना केवळ निम्म्या म्हणजेच पाच जागा जिंकता आल्या. आता तर हरियानातून त्यांना सत्ताच गमवण्याची वेळ आली आहे.
या तीन गटांमुळे भाजपचा पराभव
भाजपला हद्दपार करण्यासाठी हरियानामध्ये तीन गट सक्रीय झाले होते त्यामुळे भाजपला यंदा पराभवाचे तोंड पाहावे लागणार आहे. खासकरुन राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाजपचा परभाव होणार हे काही दिवसांपुर्वी भाकित केले होते. त्यांनी म्हटल्यानुसार, "हरयाणातील निवडणुका काँग्रेसच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात गेल्या आहेत आणि त्याचे कारण काँग्रेस नाही. ही निवडणूक सुरू होण्यापूर्वी तीन गटांनी ही निवडणूक हातात घेतली. ते तीन गट म्हणजे जवान, शेतकरी आणि कुस्तीगीर होयं. या तीन लोकांनी आधीच भाजपविरोधात निर्णय घेतला आहे." आता हे भाकित खरे ठरताना दिसत आहे.
2019 ची आकडेवारी काय सांगते
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने हरियाणात 40 जागा जिंकल्या होत्या.
- तेव्हा पक्षाची मतांची टक्केवारी 36.49% होती. तर याच निवडणुकीत काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या, त्यांची मतांची टक्केवारी 28.08% होती. जेजेपीला 10 जागा मिळाल्या होत्या. मतांची टक्केवारी 14.80% होती.
- INLD ला फक्त एक जागा मिळाली आणि त्यांची मतांची टक्केवारी 2.44% होती.
- HLP म्हणजेच हरियाणा लोकहित पार्टीलाही 1 जागा मिळाली.
- 2019 मध्ये 'आप'ला एकही जागा जिंकता आली नाही. 7 जागा अपक्षांना गेल्या
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications