महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा का झाली नाही? निवडणूक आयोगाने 'हे' सांगितले कारण, वाचा
Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जम्मू काश्मिर आणि हरियाना विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, पण महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. यामागे महत्वाचे कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
जम्मू काश्मीरात विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात होणार असून 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे असे राजीवकुमार यांनी सांगितले आहे. तर महाराष्ट्रात तूर्त विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी घोषणा केली नाही.

आयोगाने सांगितले हे मोठे कारण
महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर न करण्याबाबत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
ऑक्टोबरमध्ये घोषणा होण्याचे संकेत
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, एकाच वेळी चार राज्यात निवडणुका घेणे शक्य होईल असे नाही. सध्या जम्मू काश्मिरात विधानसभा निवडणुका पार पाडणे हे आव्हानाचे काम आहे. एकावेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असल्याच तो पुर्ण कालावधी झाल्याशिवाय निवडणूक आयोग दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करत नाही.
यामुळे आता महाराष्ट्रात निवडणुका कधी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियानाच्या निवडणुका झाल्यानंतर साधारणतः चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा आयोग करू शकते.
आता दिवाळीनंतरच महाराष्ट्रात निवडणुका
जम्मू काश्मीरमध्ये आज निवडणुका घोषित झाल्या निवडणुकीच्याच काळात अर्थात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात अनेक सण आहेत. ते याच काळात येत असतात. पितृ पक्ष, नवरात्री, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता दिवाळीनंतरच महाराष्ट्रात निवडणुका होतील हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासह झारखंडच्या निवडणुका होणार आहे.












Click it and Unblock the Notifications