अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीकरांसाठी अजून एक मोठ आश्वासन, म्हणाले आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर...
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काही मोजकेच दिवसच शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला आणखी एक वचन दिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, जर ते आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पुढील पाच वर्षांत दिल्लीतील सर्व भागातील गटार लाईनची दुरुस्ती केली जाईल.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "गेल्या 10 वर्षात आम्ही दिल्लीत नवीन गटार लाईन टाकण्याचे बरेच काम केले आहे, काही भागात अजूनही काम शिल्लक आहे. पुढील 5 वर्षांत दिल्लीतील सर्व भागातील सीवरेज लाईन्स दुरुस्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
'मी एक अभियंता आहे, मला काम कसे करायचे हे माहित आहे, राजकारण नाही'
अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. केजरीवाल म्हणाले की, पैसे किंवा भेटवस्तू देऊन तुमचे मत खरेदी करू इच्छिणाऱ्यांपासून सावध राहा. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे, तो आपण कधीही विकू नये. तुमचे मत केवळ तुमचा आवाजच नाही तर देशाचे भविष्य देखील ठरवते. काम बघा आणि योग्य लोकांची निवड करा.
एक पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी नेहमीच म्हणतो की, मी एक अभियंता आहे आणि मला काम कसे करायचं माहित आहे, राजकारण नाही. पहिल्यांदाच कोणीतरी राजकारण सोडून दिल्लीच्या समस्या आणि त्यावरील उपायांवर थेट चर्चा केली आहे. जर तुमच्याकडे या समस्या सोडवण्यासाठी अधिक चांगला उपाय असेल तर कृपया मला लेखी पाठवा.
पिछले 10 साल में हमने दिल्ली में नए सीवर डलवाने के बहुत काम किए, कुछ इलाक़े बचे हैं। हमारा लक्ष्य अगले 5 साल में दिल्ली के सभी इलाक़ों की सीवर लाइन ठीक करना है। https://t.co/TSDAGs9YU4
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 25, 2025
दिल्लीतील यमुनेच्या स्वच्छतेबद्दल केजरीवाल यांचं भाष्य
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल म्हणाले, "यमुना स्वच्छ करणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडे रोडमॅप तयार आहे. पण भाजपच्या नकारात्मक राजकारणामुळे ते थांबवावे लागले. ते पाइपलाइनमध्ये आहे. हे होईल. हे काम माझ्यासाठी महत्वाचं आहे. जर तुम्हाला पाणी, वीज आणि यमुनेसाठी काम करायचे असेल तर माझ्याकडे या. माझ्या साथीदारांना तुरुंगात टाकल्यामुळे यमुनेचे पाणी स्वच्छ झाले नाही. यामुळे माझ्या टीम विभागली गेली होती. पण आता आम्ही त्यावर मात करू शकलो आहोत," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications