Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : 'मी अपयशी झालो, मला मतदान करू नका' भाजप नेत्याने केजरीवालांच्या कटआउटसह यमुनेत डुबकी मारली

Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्योरापावरुन आता राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर अनोख्या पद्धतीने हल्लाबोल केला आहे. खरंतर हा मुद्दा यमुना नदीच्या प्रदूषणाचा आणि त्याच्या उपाययोजनांचा आहे. या मुद्द्यावरुन आता राजकीय पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजप नेते परवेश शर्मा यांचा हटके प्रचार

परवेश वर्मा भाजपच्या तिकिटावर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शनिवारी जेव्हा ते यमुना नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा त्यांच्या हातात केजरीवाल यांच्या नावाचा कटआउट होता. कटआउटमध्ये केजरीवाल कान धरून संदेश देत असल्याचे दिसून आले, "मी अपयशी ठरलो आहे, मला मतदान करू नका, मी 2025 पर्यंत यमुना स्वच्छ करू शकलो नाही" असं बॅनरवर मजकूर लिहिलेला आहे.

Delhi Assembly election 2025

प्रवेश वर्मा यांनी एका बोटीत चढून हे कटआउट यमुनेत बुडवले, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आपण यमुना माईची सर्व घाण साफ करू शकतो. हे रॉकेट सायन्स नाही," असं म्हटलं आहे.

यमुना नदीचे प्रदूषण दिल्लीतील लोकांसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. हा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या चर्चेचा एक प्रमुख मुद्दा बनला आहे. भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारच्या अपयशांवर हल्ला चढवत हा मुद्दा उपस्थित केला आहे.

यापूर्वी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याला उत्तर देताना म्हटले होते की, योगी आदित्यनाथ मथुरेतील यमुना नदीचे पाणी पिण्याची हिंमत करतील का? काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी भाजपवर यमुनेला राजकीय मुद्दा बनवल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसला जस संधी मिळाली तर ते यमुनेची स्वच्छता करुन दाखवतील असं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी दिल्लीतील निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. या निवडणूकीसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर काही जागांवर ही लढत तिरंगी होऊ शकते. या निवडणुकीत काँग्रेसनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे, त्यांचे अनेक मोठे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+