Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांची विरोधाकांवर टीका, म्हणाले यांना शांततापूर्ण वातावरण बिघडवायचे आहे

Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरापाने ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणूकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टीक करत आहेत.

नवी दिल्ली मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी भाजप आणि एआयएमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली आहे. एएनआयशी बोलताना संदीप दीक्षित म्हणाले,'सर्वत्र जातीयवाद आणणे हे त्यांचे काम आहे. त्यांना फक्त ईशान्य दिल्ली, ओखला आणि इतर ठिकाणी निवडणुकांदरम्यान शांततापूर्ण वातावरण बिघडवायचे आहे.' भाजपनेही जातीयवाद भडकवण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीत त्यांना यश आले नाही.

sandeep dixit

काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी यांना दिल्लीतील काँग्रेसच्या विजयाची भीती आहे. यादरम्यान दीक्षित यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. योगी यांनी म्हटलं होते की, जर त्यांना यमुना स्वच्छ आढळली तर अरविंद केजरीवाल यमुनेत डुबकी मारू शकतात का?

मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानतो

संदीप दीक्षित यांनी मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानताना म्हटले की, 'मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानू इच्छितो. राजीव गांधी सरकारच्या काळात 1987-88 मध्ये गंगा कृती योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्व सरकारे त्यावर काम करत राहिली. गेल्या 5-6 महिन्यांशिवाय आजपर्यंत हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला नाही?

शीला दीक्षित यांच्या काळात नजफगड आणि शाहदरा नाल्यांचे पाणी स्वच्छ करण्यासाठी 7 इंटरसेप्टर बसवण्यात येणार होते. दिल्लीच्या उद्ध्वस्त यमुनेला अरविंद केजरीवाल थेट जबाबदार आहेत. नवीन सरकार यमुना स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत नाही, तोपर्यंत सर्व काही ठीक होईल असे मला वाटत नाही, असं दीक्षित यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+