Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण होते राणा सांगा? ज्यांच्यावरुन वाद झाल्याने आत्ता अख्खे सभागृह बंद पडले; वाचा संपूर्ण प्रकरण

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासात राणा सांगा यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र आज त्यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सभागृहात चांगलाच वाद रंगला. समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप व काँग्रेसच्या राजपूत नेत्यांनी रामजीलाल सुमन यांच्या विधानाच्या निषेधार्थ सभात्याग केला. काय आहे संपूर्ण प्रकरण व कोण होते राणा सांगा हेच आपण पाहूयात...

why is there controversy over Rana Sanga

नेमका काय झाला वाद?

समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व पक्षीय रजपूत नेत्यांनी सभात्याग केला. मुख्यमंत्री भजनलाल, उपमुख्यमंत्री दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. काँग्रेसचे माजीमंत्री प्रताप सिंह खाचरिया यांनीही सपा खासदारावर टीका केली. वीर शिरोमणी राणा सांगा यांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी त्यांची बडतर्फीची मागणी केली गेली.

कोण होते राणा सांगा?

राणा सांगा यांचे पूर्ण नाव महाराणा संग्राम सिंह आहे. राजस्थानच्या गौरवशाली इतिहासात राणा सांगा यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. १५२७ मध्ये भरतपूरच्या रूपवास तहसीलमधील खानवा येथे बाबर आणि राणा सांगा यांच्यात भयंकर युद्ध झाले होते. इतिहासकारांच्या मते या युद्धात राणा सांगा यांना ८० जखमा झाल्या परंतु त्यानंतरही राणा सांगा यांनी युद्ध थांबवले नाही. राणा सांगा हे मेवाडचे पहिला शासक होते ज्यांनी दिल्लीला लक्ष्य केले. त्याने त्याच्या सभोवतालच्या संस्थानांवर विजय मिळवून आपला झेंडा फडकवला. त्याच्या या विजयांचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्येही आढळतो. ३० जानेवारी १५२८ रोजी चित्तौडगडमध्ये एका कटाचा भाग म्हणून राणा सांगा यांना विष देऊन मारण्यात आले.

राणा सांगा- खिलजी युद्ध

राणा सांगा आणि महमूद खिलजी यांच्यात युद्ध झाले. तेव्हा राणा सांगा यांनी महमूद खिलजीचा पराभव करूनही उदारता दाखवली. युद्धात हारल्यानंतरही खिलजीला मालव्याचे अर्धे राज्य देऊन टाकले. राणा सांगा यांनी मांडूच्या सुलतानला ३ महिने तुरुंगात टाकल्यानंतर त्याची सुटका केली. राजस्थानच्या गौरवशाली इतिहासात महाराणा सांगा यांना एक उदार शासक म्हणूनही ओळखले जाते.

त्यांचा पराक्रमही गाजला

राजस्थानचा इतिहास महाराणा सांगा यांच्या शौर्याच्या उदाहरणांनी भरलेला आहे. इतिहासकार म्हणतात की जेव्हा जेव्हा महाराणा सांगा युद्ध करायला जात असत तेव्हा विजय मिळाल्यानंतर ते शत्रूचा तंबू उखडून टाकत असत आणि पुरावा म्हणून ते सोबत आणत असत. इतिहासकार सांगतात की १५२७ मध्ये राणा सांगा यांनी बयानाच्या लढाईत कमाल खान लोधीच्या लष्करी छावणीवर हल्ला केला आणि लोधीचे तंबू उखडून टाकले आणि ते आपल्यासोबत आणले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+