सायबर फसवणुकीतून ग्राहकांना मिळणार दिलासा, केंद्राचा मोठा निर्णय, लाँच केली नवीन प्रणाली, वाचा
Cyber frauds, Centre launches new system : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. नुकत्याच आग्रा येथे इंटरनॅशनल कॉलवरुन मोठी फसवणूकीची घटना समोर आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या दूरसंचार सेवा प्रदाते (TSPs) च्या सहकार्याने DoT ने एक प्रगत प्रणाली लॉंच केली आहे. जी भारतीय दूरसंचार ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी येणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ केलेले कॉल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आग्रा येथील फसवणूक कॉलच्या दुर्दैवी घटनेवर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर फसव्या मोबाइल नंबरचे व्हॉट्सॲप खाते बंद केले गेले आहे. निवेदनात पुढे म्हटले की, नागरिकांनी देखील आमची विनंती आहे.

जर एखादा संदेश/कॉल फसवणूकीचा संशयित वाटला असेल तर तो त्याची माहिती http://sancharsaathi.gov.in वर Chakshu पोर्टलवर कळवावी. दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर फसवणूकीवर आता केंद्र सरकारच्या वतीने एक नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. दूरसंचार सेवा प्रदाते (TSPs) च्या सहकार्याने DoT ने एक प्रगत प्रणाली कार्यान्वित केली.
दोन टप्प्यात होणार प्रणाली कार्यान्वित
या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सांगण्यात आले आहे की, ही प्रणाली दोन टप्प्यात असणार आहे. प्रथम म्हणजे टीएसपी स्तरावर. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या फोन नंबरसह फसवणूक केलेले कॉल रोखण्यासाठी ही उपयुक्त ठरणार आहे. तर प्रणालीचा दुसरा स्तर म्हणजे केंद्रीय स्तर. TSPs च्या सदस्यांच्या संख्येसह स्पूफ केलेले कॉल थांबविण्याचे काम त्याला रोखण्याचे काम केले जाणार आहे.
विभागाने सांगितले की, आतापर्यंत चारही TSP ने ही प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. "4.5 दशलक्ष स्पूफ केलेल्या कॉल्सपैकी सुमारे एक तृतीयांश कॉल भारतीय दूरसंचार नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात आहेत. पुढील टप्प्यात, सर्व TSPs वरील उर्वरित स्पूफ केलेले कॉल दूर करणारी केंद्रीकृत प्रणाली समाविष्ट करून ती देखील लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचा मानस विभागाने व्यक्त केला.
मुळात फसवणूक करणारे लोक सातत्याने नवनव्या क्लृप्त्या वापरतात. त्यामुळे दूरसंचार वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी दूरसंचार विभाग वेळेवर उपाययोजना करत आहे कारण हे नवीन मार्ग जर अवलंबले गेले नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या युगात दूरसंचार इको-सिस्टीम अधिक सुरक्षित आणि सुरक्षित करण्यासाठी दूरसंचार विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
यावर करू शकता तक्रार....!
दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, नागरिक संचार साथी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सुविधेवर https://sancharsaathi.gov.in/ संशयित फसवणूक कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप संदेशांसह स्क्रीनशॉट, पावतीचे माध्यम, श्रेणी यांचा तपशील देऊन अशा कॉलची तक्रार करू शकतात. उद्देशित फसवणूक, अशी संप्रेषण प्राप्त करण्याची तारीख आणि वेळ. ओटीपी आधारित पडताळणी केली जाईल.












Click it and Unblock the Notifications