Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यसभेत अमित शहा आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?, काँग्रेसने का केली राजीनाम्याची मागणी?, वाचा सविस्तर

Congress accuses Amit Shah of insulting Babasaheb Ambedkar : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा परिस्थितीत बुधवारी अधिवेशनाच्या 18व्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहा यांनी अवमान केल्याचा आरोप करून कॉंग्रेसने लोकसभेसह राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. त्याचबरोबर काँग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

खरं तर, मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा केली होती. ज्यामध्ये त्यांनी संविधानापासून अर्थव्यवस्थेवर बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला, दरम्यान त्यांनी आंबेडकरांच्या कार्याबद्दल उल्लेख केला. यावेळी बोलताना त्यांनी आंबेडकरांचा अवमान केला आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला.

आज दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात जय भीमच्या घोषणा दिल्या. याआधी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देखील होती.

Parliament Winter Session 2024

अमित शहा आंबेडकरांवर काय म्हणाले?

मंगळवारी राज्यसभेत संविधानावर चर्चा करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, त्यांनी (काँग्रेस) आंबेडकरांइतके देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते.

'आता ही फॅशन झाली आहे, आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकरांइतके देवाचं इतकं नाव घेतलं असतं तर ते सात जन्म स्वर्गात गेले असते' असे विधान शहा यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शहा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

खरगेंनी केली शहांच्या राजीनाम्याची मागणी?

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला आहे. त्यांची मनुस्मृती आणि आरएसएसची विचारधारा स्पष्ट करते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी नाही. त्यांना संविधानाचा आदर करायचा नाही. आम्ही याचा निषेध करतो आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करतो.

किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला कोंडीत पकडले

दुसरीकडे, राज्यसभेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात आंबेडकरांबद्दल आमचा आदर स्पष्टपणे व्यक्त केला होता. त्यांनी असेही सांगितले की काँग्रेसने आंबेडकरजींचा कसा अपमान केला आहे. ते हयात असताना काँग्रेस पक्षाने त्यांना इतकी वर्षे भारतरत्न देऊन सन्मानित केले नाही आणि सोबतच काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांचा अपमान केला. 1952 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला. मी बौद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारा व्यक्ती आहे. 71 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बौद्ध (म्हणजे मला) देशाचा कायदा मंत्री केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+