Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकनंतर चीनच्या कुरापती! 'अरुणाचल'मधील गावांची नाव बदलली; भारताने चीनला ठणकावत दिले प्रत्युत्तर

China changed names of villages in Arunachal : पाकिस्तानच्या कुरापती सुरु असतानाच चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशातील काही गावांची नावे बदलली आहे. यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावत अरुनाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहणारच असे ठणकावले.

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याबाबत चीनने केलेल्या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले "आम्हाला असे आढळून आले आहे की, चीनने भारतीय अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे ठेवण्याचे त्यांचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेशी सुसंगत, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो.

China changed names of villages in Arunachal

अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग होता, आहे राहणारच

रणधीर जयस्वाल म्हणाले, "रचनात्मक नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही."

चीनचा अरुणाचल प्रदेशवर आधीपासूनच डोळा आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेश हा आपला भाग असल्याचा पोकळ दावा चीन करत आला आहे. यापूर्वीही चीनने अरुणाचल प्रदेशशी निगडीत खोडसळ गोष्टी तो करत आला आहे.

चीनने बदलली होती 30 विविध शहर, गावांची नावे

चीनने 2024 मध्ये अरुणाचलप्रदेशातील 30 विविध शहरांची, गावांची नावे बदलली आणि यादी जाहीर केली होती. त्यानंतर भारताने ही यादी फेटाळून लावली होती.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही चीनला फटकारले होते

दरम्यान भारताने आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात नावे बदलण्याचा घाट घातल्यावरुन चीनला सुनावले होते आणि अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग आहे अरुणाचल आता आणि भविष्यातही राहणारच आहे. नावे बदलून काहीही उपयोग नाही असे त्यांनी म्हटले होते. शेजारी राष्ट्र पाकिस्तानकडून पोसलेल्या दहशतवाद्यांमार्फत पाकिस्तान भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आला आहे.

दहशतावाद्यांचे केंद्रबिंदू पाकिस्तान असल्याचे स्पष्ट आहे आणि भारतानेही जगासमोर याचे अनेक पुरावे आणले आहेत, अशा स्थितीत भारत-पाक संघर्षही झाला, पाकिस्तानला गुढघे टेकवण्याची वेळ आली. यापुर्वीच चीनकडूुन भारताच्या भुभागावर दावा करणे सुरु आहे. चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा आताच नाही यापुर्वी अनेकदा केला आहे पण त्यांचे दावे फोल आहेत, हेच भारताने वारंवार सिद्ध केले आहे. तरीही चीनच्या कुरापती मात्र कमी होताना दिसत नाही. भारत मात्र चीनला भीक घालत नाही असेच आज परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनाचा अर्थ आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+