Shivaji Maharaj Punyatithi: 3 एप्रिल1680ची 'ती' काळरात्र; शेवटच्या दिवशी शिवराय काय म्हणाले होते?
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 3 एप्रिल 2025 रोजी 345 वा पुण्यतिथी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. स्वराज्य निर्मितीची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि ती उंच पताकावर नेऊन ठेवली. त्या राजांचे जाणे हे मराठेशाहीसाठी मोठे नुकसान होते.
महाराजांची संपूर्ण आयुष्य केवळ 50 वर्षांचे होते. त्यांनी या कमी कालावधीत देखील संपूर्ण देशात मुघलांच्या विरोधात लढा देऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यांना अनेक मावळ्यांची साथ मिळाली. 3 एप्रिल 1680 ती काळरात्र कोणीही विसरू शकणार नाही.
शेवटच्या क्षणाला छत्रपती शिवरायांनी अतिशय महत्त्वाचे विधान केले होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शेवटच्या विधान कोणते व काय होते, याची माहिती जाणून घेऊया आणि महाराजांच्या जीवनाविषयी देखील जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिनिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

शिवाजी महाराज यांचा जन्म कधी?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले.
शिवाजी महाराजांच्या कुटुंबाविषयी जाणून घ्या?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आहेत. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. तर शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना नियुक्त करण्यात आले होते. शिवाजी महाराज यांच्या पत्नीचे नावे सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई अशी होती.
शिवाजी महाराजांना मुलं किती होते?
यानिमित्ताने शिवाजी महाराज यांच्याविषयी रंजक माहिती सांगणार आहेत. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्याही होत्या याची फारशी माहिती कुणाला नाही.
शिवाजी महाराजांचे सिंहासन कुठे आहे?
यातूनच मग गडकिल्ल्यांच्या भेटी असो किंवा ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून असो या न त्या मार्गानं तो काळ अनुभवण्याचा अनेकांचाच प्रयत्न असतो. महाराजांविषयीच्या याच कुतूहलपूर्ण गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचं राजधानी रायगड येथे असणारं तब्बल 32 मण सोन्याचं सिंहासन
शिवरायांची समाधी कुठे आहे?
3 एप्रिल १६८० साली शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर, त्यांचे अंत्यसंस्कार हे रायगड किल्ल्यावर करण्यात आले. त्यांची समाधी नंतरच्या कालखंडात बांधण्यात आली होती. मराठा कालखंडात या समाधीवर एक दगडी रचना बांधण्यात आली होती.
3 एप्रिल 1680 रोजी काय घडले?
मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी ३ एप्रिल रोजी शूर मराठा राजाची पुण्यतिथी साजरी केली जाते.
शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द काय होते?
आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....!!












Click it and Unblock the Notifications