पावसाळयात वाहन चालवताना अशी घ्या काळजी, मोठ्या दुर्घटनेपासून होईल बचाव
पावसाळ्याच्या दिवसांत वाहन अत्यंत काळजीपूर्वक चालवावे लागते. कमी दृश्यमानता, दरड कोसळणे, वाहन रस्त्यावरून घसरणे अश्या अनेक घटना घडत असतात.
अनेकांना त्यात जीव गमवावा लागतो. पावसाळ्यात वाहन चालवणे कठीण होऊन बसते. कमी दृश्यमानता आणि ओले रस्ते यामुळे अपघाताचा धोका वाढतो. पावसाळ्यात गाडी चालवताना नीट चालवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कमी दृश्यमानतेच्या समस्येला बहुतांश लोकांना सामोरे जावे लागते.

अनेकवेळा असे घडते की समोरून येणारे वाहन देखील दिसत नाही आणि काही वेळा इतरांना तुमचे वाहन स्पष्टपणे दिसत नाही, अशा स्थितीत अपघाताचा धोका वाढतो. यासोबतच ओल्या रस्त्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढतो. यासाठी पावसाळ्यात वाहन चालवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आलेल्या आहेत. या घटनांमध्ये कित्येकदा मोठी जिवीतहानी सुद्धा झालेली आहे. तसेच पावसाळ्यात दुचाकीसारखे वाहन रस्त्यावरून घसरण्याची शक्यता असते. यामुळे सुद्धा अनेकदा अपघात होत असतो.
या बाबी लक्षात घेऊन पावसाळ्यात कमी वेगात गाडी चालवण्यासह इतर गोष्टींची विशेष काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. भारतात पावसाळा सुरू झाला आहे. या मोसमात वाहन चालवताना लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, म्हणून पुढील काही गोष्टींचे आपण पालन करावे.
वायपर व्यवस्थित ठेवा
जुने वायपर ब्लेड बदलणे फार महत्वाचे आहे, कारण नवीन वायपर ब्लेडमुळे काचेवरील पाणी चांगले स्वच्छ होते. आणि रस्त्यावरील वाहने व्यवस्थित दिसतात.
हेडलाइट्स, इतर लाइट्स तपासा
जर तुमचे हेडलाइट्स चांगले नसतील, तर ते व्यवस्थित काम.करणार नाहीत. ज्यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवताना आपणास त्रास सहन करावा लागू शकतो.
टायर आणि ब्रेकची घ्या विशेष काळजी
पावसाळ्यात टायर आणि ब्रेकची विशेष काळजी घ्या. हा सीझन सुरू होण्यापूर्वीच, टायरची ट्रीड किंवा ग्रिप डेप्थ चांगली आहे का ते तपासा, यामुळे वाहन घसरण्याचा धोका कमी होतो. यासह, ब्रेक पॅड आणि डिस्क देखील वेळोवेळी तपासा.
कमी वेगाने वाहन चालवा
दुचाकी असो अथवा चारचाकी वाहन पावसाळ्यात वाहनाचा वेग कमी ठेवा, कारण पावसात वाहने घसरण्याचा धोका आधीच असतो. आणि हा धोका अधिक वेगाने वाढतो. तसेच आपले लक्ष रस्त्यावर केंद्रित ठेवून वाहन चालवा.
वरील काही टिप्स वापरून आपण पावसाळयात सुरक्षित प्रवास करू शकता. डोंगराळ भागात पावसाळयात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशावेळी जास्त पावसाच्या वेळी घाटस्त्याने प्रवास करणे आपण शक्यतो टाळावे. याचबरोबर दुचाकीचा प्रवास केल्यास कधीही चांगला.












Click it and Unblock the Notifications