Budget 2025 : पाकिस्तान-चीनला सावधानतेचा इशारा..? संरक्षण बजेटमध्ये हजारो कोटींची वाढ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी 2025-26 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटींची तरतूद करण्यात आली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा चांगलीच जास्त आहे. भारताला वारंवार त्रास देणाऱ्या पाकिस्तान व चीनसाठी हा एक प्रकारचा रेड अलर्टच समजला जात आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये 36 हजार 959 कोटींची वाढ केल्याचे दिसले.

संरक्षणावर भरीव तरतूद
भारत सरकारने 2024-25 मध्ये संरक्षणासाठी 4 लाख 54 हजार 663 कोटी रुपये दिले होते. यंदा त्यात 36 हजार 959 कोटींची भरीव वाढ करण्यात आली. आजच्या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्राला सर्वात जास्त निधी दिल्याचे दिसले. यावेळी संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटी रुपये देण्यात आले.
संरक्षण दलाचे अधुनिकीकरण
संरक्षण क्षेत्राला दिलेल्या भरीव निधीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्यावेळीपेक्षा यंदा 37 हजार कोटी रुपये जास्त मिळाले. एकूण बजेटच्या 13.44 टक्के संरक्षण क्षेत्राला मिळाले. त्यातून संरक्षण दलाचे अधुनिकीकरण होणार आहे. सशस्त्र दलांच्या क्षमता वाढविल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भयतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल.
उपचारासाठीही भरीव निधी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले, या निधीमुळे संरक्षण उद्योगांनाही चालना मिळेल. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण दलाअंतर्गत 3 लाख 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. जे गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा 10 टक्के जास्त आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications