Bilaspur Railway Accident : मालगाडी-पॅसेंजरची टक्कर का झाली, प्रवासी मृत्यूला जबाबदार कोण?
Bilaspur train accident reason : हावडा-मुंबई मुख्य मार्गाचा भाग असलेल्या बिलासपूर रेल्वे विभागात मंगळवारी (४ नोव्हेंबर २०२५) दुपारी ४ वाजता लालखदान परिसरात एक भीषण रेल्वे अपघात घडला.
कोरबा-पॅसेंजर मेमू ट्रेन (क्रमांक ६८२६२) आणि एका मालगाडीची झालेली टक्कर इतकी जबरदस्त होती की प्रवासी गाडीचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातात पाच जणांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले. तर २० ते २५ लोक जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

अपघाताचे स्वरूप आणि नुकसान
हा अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे मार्गाच्या सर्वात वर्दळीच्या विभागात झाला. बिलासपूर रेल्वेचे सीपीआरओ डॉ. सुस्कर विपुल विलासराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी ट्रेन मागून एका मालगाडीला धडकली. टक्कर झाल्यानंतर पॅसेंजर ट्रेनचे इंजिन आणि पुढील तीन ते चार डबे रुळावरून घसरले. यामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर आणि सिग्नल सिस्टीमचे मोठे नुकसान झाले. हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा वळवण्यात आल्या आहेत.
घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "ट्रेन अचानक एका झटक्याने थांबली. पुढच्याच क्षणी मोठा आवाज झाला आणि सर्वांनी उड्या मारल्या.
#WATCH | Bilaspur, Chhattisgarh: IG Sanjeev Shukla says, "MEMU train and a goods train collided, in which some people have been injured. The rescue operation is underway. We are trying to rescue a person trapped inside..." https://t.co/enkpNHyiWh pic.twitter.com/cOgdk5ZNAj
— ANI (@ANI) November 4, 2025
मदत आणि मदतकार्य
रेल्वे प्रशासन, एनडीआरएफ, वैद्यकीय व्हॅन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. जखमींना बिलासपूर सदर रुग्णालय आणि जवळच्या वैद्यकीय युनिट्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
कवच' प्रणालीवर प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम ('कवच') च्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कवच हे भारतीय रेल्वेचे एक स्वदेशी तंत्रज्ञान आहे, जे मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे गाड्यांना टक्कर होण्यापासून आपोआप थांबवते. जेव्हा ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडण्याची चूक करतो, तेव्हा ही प्रणाली ट्रेनची ब्रेकिंग सिस्टीम आपोआप सक्रिय करते. तज्ज्ञांनी अपघातासाठी 'कवच' प्रणालीच्या देखभालीची कमतरता किंवा अभाव याला कारणीभूत ठरवले आहे.
मदत आणि भरपाईची घोषणा!
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आणि जखमींवर उपचार करणे ही प्राथमिकता असल्याचे सांगितले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी तात्काळ मदतीचे निर्देश दिले. रेल्वे प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना एक्स-ग्रेशिया जाहीर केला आहे:
- मृतांच्या कुटुंबियांना: ₹१० लाख
- गंभीर जखमींना: ₹५ लाख
- किरकोळ जखमींना: ₹१ लाख












Click it and Unblock the Notifications