बिहारमध्ये सत्तास्थापनेची लगबग: नितीश कुमारांचा राजीनामा; या दिवशी १०व्यांदा CMची शपथ! मोदी येणार!
Bihar new government formation : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) रोजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सध्याची विधानसभा बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

उद्या बैठकांचे सत्र: विधिमंडळ नेत्याची निवड
नव्या सरकारचा मार्ग मोकळा करण्यासाठी उद्या, मंगळवारी (१८ नोव्हेंबर २०२५) महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत: एक बैठक जेडीयू (JDU) विधिमंडळ पक्षाची बैठक, तर दुसरी भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाची बैठक होईल.
या दोन बैठकांनंतर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे, ज्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. यानंतर, राज्यपाल महोदयांकडे नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाईल.
२० नोव्हेंबरला शपथविधी, मोदींची उपस्थिती
नितीश कुमार हे २० नोव्हेंबर २०२५ रोजी गांधी मैदानात दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी दिली आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे.
नवीन मंत्रिमंडळात ३६ मंत्री?
बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. मंत्रिमंडळात किती मंत्री शपथ घेतात, याबद्दल दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत: १. फक्त नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. २. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि २० मंत्री एकाच वेळी शपथ घेतील.
- घटक पक्षांनुसार अपेक्षित मंत्रीपदे (एकूण ३६)
- पक्ष : अपेक्षित मंत्र्यांची संख्या: तपशील
- भाजप : १६ : दोन उपमुख्यमंत्र्यांसह
- जेडीयू : १६ : मुख्यमंत्र्यांसह
- लोजपा (आर) : २ : उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता
- एचएएम : १ :
- आरएलएसपी : १ :
जीतन राम मांझी यांनी आधी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे १६, जेडीयूचे १५, एलजेपी (आर) चे ३ आणि एचएएम आणि आरएलएसपीचे प्रत्येकी एक मंत्री असण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण, आचारसंहिता समाप्त
निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंजियाल यांनी २४३ नवनिर्वाचित आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली आहे. यामुळे, राज्यातील निवडणूक आचारसंहिता तातडीने संपुष्टात आणली गेली असून, सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने पुढे सरकणार आहे.
बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय!
या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा मिळवून ऐतिहासिक विजय नोंदवला. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही हा आकडा मोठा ठरला. याउलट, महाआघाडी केवळ ३५ जागांपर्यंतच मर्यादित राहिली.
आरजेडीचे "एमवाय" (मुस्लिम-यादव) समीकरण कोसळले, खासकरून सीमांचल भागात मुस्लिमांनी आरजेडीऐवजी एआयएमआयएमला मत दिल्याचे दिसून आले.
एनडीएने मिळवलेला हा विजय २०१० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांशी मिळताजुळता आहे. या वेळी भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला, तर जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications