Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नितीश कुमारांचा पगार, पेन्शन किती? महिन्याला खात्यात जमा होतो 'एवढा' पैसा! ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

Bihar CM Nitish Kumar Salary And Pension : बिहारमध्ये विक्रमी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना मिळणारे वेतन तर आहेच, पण त्यासोबतच त्यांना दरमहा लाखो रुपयांची पेन्शनही मिळते. ही पेन्शन त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी नसून माजी खासदार आणि माजी आमदार म्हणून मिळते. ही नेमकी किती रक्कम आहे आणि कोणत्या नियमांनुसार त्यांना ही दुहेरी पेन्शन मिळते, याबद्दलची सविस्तर माहिती वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Bihar CM Nitish Kumar Salary

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या फक्त मुख्यमंत्रीपदाचे ₹2.5 लाख वेतनच घेत नाहीत, तर त्यांना माजी खासदार आणि माजी आमदार म्हणून दोन वेगवेगळ्या पेन्शनचा लाभही मिळतो. यामुळे त्यांच्या खात्यात दर महिन्याला सुमारे पाच लाख रुपये जमा होतात.

नितीश कुमारांच्या कमाईचे गणित

१. मुख्यमंत्री म्हणून वेतन आणि सुविधा

मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांना सुमारे ₹2.5 लाख (अडीच लाख रुपये) इतके वेतन मिळते. या व्यतिरिक्त त्यांना खालीलप्रमाणे अनेक सरकारी सुविधा मिळतात.

  • सरकारी निवासस्थान
  • वाहन
  • कार्यालयीन खर्च
  • उच्च सुरक्षा व्यवस्था
  • इतर भत्ते आणि महागाई भत्ता

    Take a Poll

    दुहेरी पेन्शनचा मोठा लाभ

    मुख्यमंत्रीपदाच्या वेतनाव्यतिरिक्त, नितीश कुमार हे त्यांच्या मागील राजकीय कारकिर्दीतील दोन पदांसाठी पेन्शनचे हक्कदार आहेत, ज्यामुळे त्यांच्या एकूण उत्पन्नात मोठी भर पडते.

    आमदार म्हणून पेन्शन

    नितीश कुमार यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून सुरुवात केली आणि ते अनेकवेळा बिहार विधानसभेत पोहोचले आहेत. पहिल्या कार्यकाळासाठी त्यांची पेन्शन ₹45,000 निश्चित आहे.

    खासदारांप्रमाणे, आमदारांच्या कार्यकाळानुसार पेन्शनची गणना होते आणि दरवर्षी पेन्शन सुमारे ₹4,000 ने वाढत जाते. त्यांच्या २१ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळानुसार त्यांना आमदार म्हणून सुमारे ₹1,38,000 पेन्शन मिळते.

    मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही वेगळी पेन्शन नसते. पेन्शन ही केवळ त्यांच्या खासदार किंवा आमदार म्हणून केलेल्या कार्यकाळावर आधारित असते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+