Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video! 'त्या' एक्सप्रेसचा मोठा अपघात, तब्बल 11 डबे आले थेट जमिनीवर, किती जखमी, किती मृत्यू? वाचा

बेंगळुरु-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसचा रविवारी अपघात झाला. या गाडीचे ११ डबे रुळावरुन घसरले. कटक जिल्ह्यातील नेरगुंडी स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Bengaluru Kamakhya Express accident

कुठे घडला अपघात?

ईसीओआर अंतर्गत येणाऱ्या खुर्दा रोड विभागाच्या कटक-नेरगुंडी रेल्वे विभागात सकाळी ११.५४ वाजता ही घटना घडली. ईसीओआर महाव्यवस्थापक आणि खुर्दा रोडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. ईसीओआरच्या अधिकृत निवेदनानुसार, अपघात मदत आणि वैद्यकीय मदत गाड्या देखील रवाना करण्यात आल्या आहेत.

काय आहे अधिकृत माहिती?

या अपघाताबाबत ईसीओआरच्या वरिष्ठांनी तातडीने माहिती दिली. त्यांनी पीटीआयला सांगितले की, "अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी एका विशेष ट्रेनची व्यवस्था केली जात आहे. आम्ही रेल्वे प्रवाशांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. भुवनेश्वर, भद्रक आणि कटक रेल्वे स्थानकांवर देखील मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत,"

नेमके काय झाले?

या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईसीओआरचे जनसंपर्क कार्यालयाकडून प्रवाशांच्या सुविधावर लक्ष्य देण्यात येत आहे. या गाडीतीप प्रवाशांना तातडीने दुसऱ्या साधनाची व्यवस्था करुन इच्छित स्थळी पोहचविले जात आहे. या मार्गावरील अडकलेल्या गाड्या वळवण्यावर आणि अपघातस्थळी बाधित प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे व त्यांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष ट्रेनची व्यवस्था केली जाईल," असे ECoR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+