मोदींचे 'मिशन २०४७' नेमके आहे तरी काय? अर्थसंकल्पाआधीच सांगितली विकासाची त्रिसूत्री
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधून अर्थसंकल्पात २०४७ चं उद्दीष्ट्य ठेवण्यात आल्याचं सांगितलं. शिवाय यातून महिला आणि तरुणांना फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मोदींचे मिशन 2047
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महालक्ष्मी नमोस्तुते मंत्र पठण केले. त्यानंतर ते म्हणाले, "देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा हे दायित्व दिलं आहे. या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं पूर्ण बजेट आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची १०० पूर्ण करू, विकसित भारताचा संकल्प या देशाने स्वीकारला आहे. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल. देश स्वातंत्र्याचे १०० वर्षे जेव्हा साजरे करेल, तेव्हा तो विकसित झालेला असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मोदींनी मांडली त्रिसुत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही मिशन मोडमध्ये देशाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. यामध्ये भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिक भिन्न स्तरावरील सर्वांगिण विकासाच्या संकल्पावरून मिशन मोडमधून पुढे जात आहोत. इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट या सातत्याने आमच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिले आहेत. या सत्रात नेहमीप्रमाणे काही ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होईल. व्यापक मंथनासोबत राष्ट्राची ताकद वाढवणारे कायदे बनतील. नारी शक्तीच्या गौरवाला पुनर्प्रस्थापित करणारे, प्रत्येक महिलेला समान अधिकार देणारे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील."
कोणती त्रिसूत्री स्विकारली?
आपल्या भाषणात मोदीजींनी त्रिसूत्री सांगितली. ते म्हणाले, "रिफॉर्म, परफॉर्मन्स, ट्रान्सफर ही त्रिसुत्री आपण स्वीकारली आहे. विकास होतो, तेव्हा सर्वांत जास्त लक्ष रिफॉर्मवर असतं. राज्य आणि केंद्र सरकार परफॉर्म करत असतो आणि जन सहभागातून आपण ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकतो. २०-२५ वर्षाचे तरुण जेव्हा ४५-५० वर्षांचे होतील, तेव्हा ते विकसित भारताचे सर्वांत मोठे लाभार्थी असतील. या बेजटमध्ये सर्व खासदार विकसित भारताला मजबुती देण्याकरता त्यांचे योगदान देतील. तरुण खासदारांसाठी हा सुवर्णक्षण आहे, ते आज संसदेत जितकी जागृकता आणि सहभाग नोंदवतील त्यांना विकसित भारताचे फळ पाहायला मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications