Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Atal Bihari Vajpayee Jayanti : अटलीजींचे 'ते' 5 ऐतिहासिक निर्णय, ज्यांनी जगाला भारताची ताकद दाखवली

Atal Bihari Vajpayee Jayanti 5 historic decisions of Atalji : भारताच्या राजकीय इतिहासात अनेक पंतप्रधान झाले, पण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. अटलजी केवळ एक कवीमनाचे नेते नव्हते, तर ते एक कणखर रणनीतीकार आणि दूरदृष्टी असलेले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले काही निर्णय केवळ धाडसीच नव्हते, तर त्या निर्णयांनी भारताला २१ व्या शतकातील आधुनिक आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्याची पायाभरणी केली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या अशा ५ ऐतिहासिक निर्णयांवर टाकूया एक नजर ज्यांनी जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

Atal Bihari Vajpayee Jayanti 5 historic decisions of Atalji

१. पोखरण-२: भारत बनला अण्वस्त्रधारी राष्ट्र (१९९८)

११ आणि १३ मे १९९८ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे भारताने पाच भूमिगत अणू चाचण्या केल्या. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या उपग्रहांची नजर चुकवून केलेल्या या चाचण्यांनी जगाला हादरवून सोडले. या निर्णयामुळे भारतावर अनेक जागतिक निर्बंध आले, पण अटलजी डगमगले नाहीत. या निर्णयाने भारताला जगातील मोजक्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या पंक्तीत बसवले.

२. सुवर्ण चतुष्कोण आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

भारताच्या विकासासाठी 'कनेक्टिव्हिटी' महत्त्वाची आहे, हे अटलजींनी ओळखले होते. त्यांनी 'सुवर्ण चतुष्कोण' प्रकल्पाद्वारे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांना जोडणाऱ्या हायवेचे जाळे विणले. तसेच, 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'द्वारे देशातील कानाकोपऱ्यातील खेडी मुख्य रस्त्यांशी जोडली, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती झाली.

३. कारगिल युद्ध आणि मुत्सद्दी विजय (१९९९)

पाकिस्तानने फसवणुकीने कारगिलच्या शिखरांवर कब्जा केला तेव्हा अटलजींनी 'ऑपरेशन विजय'ची घोषणा केली. भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत शत्रूला पळवून लावलेच, पण अटलजींनी जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडले. अमेरिकेचा दबाव झुगारून त्यांनी एलओसी (LoC) पार न करता युद्ध जिंकून भारताची नैतिक ताकद सिद्ध केली.

४. टेलिकॉम क्रांती आणि खासगीकरण

आज आपण जे स्वस्त कॉल आणि इंटरनेट वापरतो, त्याची पायाभरणी अटलजींच्या काळात झाली. त्यांनी 'न्यू टेलिकॉम पॉलिसी' (१९९९) आणली, ज्यामध्ये फिक्स्ड लायसन्स फी ऐवजी रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल सुरू केले. यामुळेच भारतात मोबाईल क्रांती झाली. तसेच, त्यांनी निर्गुंतवणुकीसाठी (Disinvestment) स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून सरकारी कंपन्यांचे कार्यक्षम खासगीकरण सुरू केले.

५. सर्व शिक्षा अभियान: शिक्षणाचा अधिकार

"सब पढे, सब बढे" या घोषणेसह अटलजींनी 'सर्व शिक्षा अभियान' सुरू केले. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, हा त्यांचा मानस होता. या निर्णयामुळे भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत झाली आणि शिक्षणाची दारे गोरगरिबांच्या मुलांसाठी खुली झाली.

हेही वाचा : Atal Bihari Vajpayee Jayanti : अटल बिहारी वाजपेयींची आज जयंती, त्यांचे 20 प्रेरणादायी विचार शेअर करा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+