केजरीवाल हे मोदींपेक्षाही चालाख; शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींनी साधला जोरदार निशाणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही रंगताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बदली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा चालाख आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Rahul Gandhi

काय म्हणाले राहुल गांधी

काँग्रेसच्या बदली मतदारसंघातील प्रचार रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे खोटे बोलतात तसे अरविंद केजरीवालही खोटे बोलतात. त्यांच्यात जास्त फरक नाही. मात्र केजरीवाल हे खोटं बोलण्यात मोदींपेक्षा हुशार आहेत. पाच वर्षांपूर्वी यमुनेचे पाणी पिण्याचे ते बोलत होते. यंदा ते यमुनेच्या पाण्याच्या फिल्टर बाटल्या घेऊन ते प्रचार करत आहेत. ते दोघेही खोटं बोलतात, मात्र केजरीवाल जास्त चलाख आहेत.

काँग्रेस शब्द पाळते

राहुल गांधी पुढे म्हणाले, तुम्ही माझी २० वर्षांपूर्वीची भाषणे काढून बघा. मी मनरेगाचे आश्वासन दिले, ते पूर्ण केले. हक्काच्या रेशनचे आश्वासन दिले, ते पूर्ण केले. कर्नाटक- तेलंगानाच्या महिलांच्या बँकेत पैसे टाकण्याचे आश्वासन दिले, ते पूर्ण केले. छत्तीसगडच्या शेतकऱ्यांच्या धान्याला भाव देण्याचे आश्वासन दिले, तो भावही आम्ही दिला. आम्ही जे बोलतो ते करतो. काँग्रेस शब्द पाळते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दिल्लीकरांशी प्रेमाचे नाते

राहुल गांधी यांनी भाषणातून दिल्लीकरांचे आणि काँग्रेसचे नाते सांगितले. ते म्हणाले, दिल्लीकरांचे आणि आमचे प्रेमाचे नाते आहे. मी तुमच्याशी खोटं बोलूच शकत नाही. मी आत्तापर्यंत खोटं बोललो नाही. यापुढेही खोटं बोलणार नाही. आपले प्रेमाचे नाते असेच कायम ठेवा आणि देवळीतून काँग्रेसचे उमेदवार देवेंद्र यादव यांना विजयी करा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+