मोदी सरकार मुस्लीम विरोधी! दर्ग्याकडे असलेली मालमत्ता सरकारला हडपायचीय - ओवैसींचा सरकारवर निशाणा
नवी दिल्ली - वक्फ बोर्डाची स्वायतत्ता कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न असून मोदी सरकार मुस्लीम विरोधी आहे, त्यांना दर्ग्याकडे असलेली मालमत्ता हडपायची आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदोद्दीन ओवैसी यांनी आज लोकसभेत केला.
केंद्र सरकारने आज संसदेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मांडले. केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू यांनी हे बील संसदेत सादर केले. त्यानंतर या बिलावर झालेल्या चर्चासत्राच्या प्रहरात असुदोद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर एनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधतानाही त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

काय म्हणाले ओवैसी?
असुद्दीन ओवैसी म्हणाले, हिंदू सगळी संपत्ती मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करु शकतात. पण आम्ही एक तृतीयांश संपत्तीच देऊ शकतो, अशी तरतूद का ? हिंदू संघटना आणि गुरुद्वारा संचालक समितीत बिगर हिंदू किंवा बिगर शिख धर्माचे लोक नसतात. मग वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम लोकांचा समावेश कशासाठी केला जातो आहे? हे दुरुस्ती विधेयक हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भेद पसवरण्याचं त्यांना एकमेकांपासून तोडण्याचं काम करणारं आहे.
#WATCH | On Waqf (Amendment) Bill, 2024, AIMIM MP Asaduddin Owaisi says, " Before the introduction of the Bill, we had sent a notice to the Speaker - under Rule 72 - that we are against the introduction of this Bill. We believe that this Bill violates the principles of Articles… pic.twitter.com/tZj2AKnaWi
— ANI (@ANI) August 8, 2024
वक्फ बोर्ड ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, वक्फ बोर्ड ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही. सरकारला दर्ग्यांकडे असलेली मालमत्ता हडप करायची आहे. मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी आहे." अशी बोचरी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर, असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "विधेयक सादर करण्यापूर्वी, आम्ही सभापतींना नोटीस पाठवली होती. नियम 72 अंतर्गत - आम्ही हे विधेयक मांडण्याच्या विरोधात आहोत. आमचा विश्वास आहे की हे हे विधेयक कलम 14, 15 आणि 25 च्या तत्त्वांचे उल्लंघन करते. हे विधेयक विशेषत: न्यायिक स्वातंत्र्य आणि अधिकारांचे उल्लंघन करते.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ज्या मशिदींवर RSS दावा करत आहे, तो हिसकावून घ्यायचा आहे. उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून ज्या दर्ग्यांवर दावा केला जात आहे ते करु नये असे करणे धोकादायक आहे. ते वक्फ बोर्डाच्या बाजूने नसून वक्फ बोर्ड संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.












Click it and Unblock the Notifications