"वो कुत्ते..कमीने!" धर्माच्या नावावर लोकांना मारले! हैवानापेक्षा वाईट काम - असुदोद्दीन ओवैसी भडकले
Asaduddin Owaisi angry at Pakistan and terrorists : "दहशतवाद्यांना पाकिस्तानचे मोठे समर्थन आहे आणि या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जे कृत्य केले दे वेदनादायी आहे. हैवानापेक्षा वाईट कृत्य या दहशतवाद्यांनी केले असून त्यांनी खालच्या पातळीवर हे कृत्य केले आहे. कुणाच्या धर्माचे नाव विचारून लोकांचे जीव घेणे हे खूपच अन्यायकारक आहे."

हैवानापेक्षा वाईट कृत्य - ओवैसी
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये जे कृत्य केले दे वेदनादायी आहे. हैवानापेक्षा वाईट कृत्य या दहशतवाद्यांनी केले असून त्यांनी खालच्या पातळीवर हे कृत्य केले आहे. कुणाच्या धर्माचे नाव विचारून लोकांचे जीव घेणे हे खूपच अन्यायकारक आहे, आम्ही आशा करतो की देवही त्यांना कडक शिक्षा करेल. या दहशतवाद्यांच्यावर जे लोक बसलेले आहेत, तेही उद्धवस्त होतील.
"किसी का नाम पूछकर जान लेना सरासर गलत है" पहलगाम आतंकी हमले पर बैरिस्टर @asadowaisi की Press Conference #PahelgamTerroristattack #pahelgam #JammuKashmir #AsaduddinOwaisi #TerroristAttack #Pahalgam #pahalgamattack #pahalgamterrorattack #owaisi #pressconference… pic.twitter.com/g0WeM88knJ
— AIMIM (@aimim_national) April 24, 2025
मला काॅल आला..मी जाणार!
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, आमच्यासारख्या छोट्या पक्षांनाही कालच्या पहलगाम येथील हल्ल्याच्या घटनेतील बैठकीसाठी बोलवायला हवे, त्यासाठी मी ट्विट केले होते की, हा मुद्दा संवेदनशील आहे आणि सर्व पक्षांना बोलवायला हवे, आता जेव्हा मी चर्चा करत होतो त्यावेळी गृहमंत्र्यांचा मला काॅल आला आणि तुम्ही या असे म्हटले आहे. मी या बैठकीला जाणार असून त्यात मी माझे मत मांडणार आहे.
मुखर्जी समितीचा अहवाल आतापर्यंत का आला नाही?
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, पहलगाम हल्ल्यानिमित्त मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो की, पहिली गोष्ट 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, तेव्हा यात्रेकरुंना जीवे मारण्यात आले होते सुमारे तीस लोकांचा यात मृत्यू झाला होता. लेफ्टनंट जनरल मुखर्जी यांची समिती बनवली होती पण त्यांचा अहवाल अजून आलेला नाही.
पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, दुसरी गोष्ट ही की, ज्या जागेवर एवढे पर्यटक आहेत त्या ठिकाणी एकही पोलिसवाला नाही. एक सीआरपीएफचा कॅम्प नाही, तिसरी गोष्ट म्हणजे सीआरपीएफचे जे युनिट आहे त्यांना जायला सव्वा तास लागला आणि या दहशतवाद्यांनी जे कृत्य केले याची चौकशी व्हायला हवे.
दहशतवादी भारतात कसे आले..?
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, हे खरे आहे की आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमधून हे दहशतवादी भारतात आले आणि त्यांनी आयएसआयचा पुर्ण सहकार्य या दहशतवाद्यांना आहे. चौथी गोष्ट म्हणजे दहशतादी सीमा ओलांडून कसे भारतात आले. याला कोण जबाबदार आहे? जर ते पहलगामपर्यंत आले तर श्रीनगरपर्यंत ते पोहचू शकतात..
सरकार दहशतवाद्यांचा बंदोबस्त करेल
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, पाचवी गोष्ट म्हणजे सव्वीस लोकांचे जीव गेलेल्यांना न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा अकाऊंटीबिलीटी निश्चित ठरेल..आणि या दहशतवाद्यांना योग्य शिक्षा मिळेल त्यांचा बंदोबस्त सरकार करेल अशी आशा आहे.
दहशतवाद्यांना धर्म नसतो.. पण
असुदोद्दीन ओवैसी म्हणाले, ही अत्यंत वाईट घटना असून आम्ही मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. सहावी गोष्ट म्हणजे एका माध्यमसमुहाने द कलमा सेफ देम अशी हेडलाईन केली अशी हेडलाईन ते कशी करु शकतात... आपण तर सर्व मुस्लिमांनाच दोषी ठरवत आहात असा त्याचा अर्थ होतो. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. ते दहशतवादी इसीसच्या आयडाॅलाॅजीवर चालणारे ते कुत्रे आहेत..असेही ते म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications