अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, आतिशी यांनी सरकार स्थापनेचा केला दावा
Arvind Kejriwal resigns : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात जाऊन आशीर्वाद घेऊन पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मार्लेना यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज संध्याकाळी नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आम आदमी पक्षाने आपल्या सर्व आमदारांच्या मदतीने आतिशी मार्लेना यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच आतिशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि पदभार स्वीकारतील.

दोन दिवसांपूर्वी केली होती घोषणा
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी दोन दिवसांत राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार केजरीवाल यांनी आज मंगळवारी संध्याकाळी राजीनामा दिला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहराही समोर आला आहे. केजरीवाल यांचा उत्तराधिकारी म्हणून आम आदमी पार्टीने आतिशी यांची निवड केली आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, जो पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमताने स्वीकारला होता.
Delhi | AAP leader and proposed CM Atishi stakes claim to form the new government before Delhi LG VK Saxena. pic.twitter.com/4wrEN3o2gY
— ANI (@ANI) September 17, 2024
हा दिल्लीच्या लोकांसाठी भावनिक क्षण
सीएम केजरीवाल यांच्या राजीनाम्याबाबत दिलेल्या निवेदनात सीएम आतिशी म्हणाल्या की, आज अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा सादर केला आहे. हा पक्ष आणि दिल्लीच्या लोकांसाठी भावनिक क्षण आहे.
तसेच, दिल्लीचे लोक अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची शपथ घेत आहेत... निवडणुका होईपर्यंत मी दिल्लीची काळजी घेईन आणि आमचा सरकार स्थापनेचा दावा आहे.












Click it and Unblock the Notifications