Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काळाचा घाला! आंध्रप्रदेशात बस दरीत कोसळून भीषण अपघात! 9 भाविकांचा मृत्यू, कसा घडला अपघात? वाचा

Andhra Pradesh bus accident 9 Dead : आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी, १२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात झाला आहे. सुमारे ३५ प्रवासी घेऊन जाणारी एक खासगी बस चित्तूर-मारेडुमिली घाट रस्त्यावर दरीत कोसळली. या भीषण अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Andhra Pradesh bus accident 9 Dead

भाविकांवर काळाचा घाला

आज पहाटे सुमारे ५:३० वाजता तुलसीपाकालू गावाजवळ, चित्तूर-मारेडुमिली घाट रस्त्यावरील एका तीव्र वळणावर हा अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी होते. ते भद्राचलम मंदिराचे दर्शन घेऊन भद्राचलमहून अन्नवरम येथे जात होते.

अपघाताचे कारण काय?

सुरुवातीच्या माहितीनुसार, घाट रस्त्यावरील तीव्र वळणांवर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस खोल दरीत कोसळली. चालकाला या परिसराची माहिती नव्हती, ज्यामुळे ही चूक झाली असावी. या घटनेत बस (क्रमांक AP 39 UM 6543) पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे.

बचावकार्य आणि मदतीची स्थिती

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार. बसमध्ये ३५ प्रवासी, दोन चालक आणि एक क्लीनर होते. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून यासंदर्भात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमी झालेल्या सात प्रवाशांना तातडीने घटनास्थळापासून १५ किमी दूर असलेल्या सीएचसी चिंतूर येथे उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जखमींना पुढील उपचारांसाठी भद्राचलम येथील रुग्णालयात हलवले जाणार आहे. या दुर्घटनेनंतर बचाव आणि मदत कार्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंकडून शोक व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. चंद्रबाबू नायडू म्हणाले, "अल्लुरी सीताराम राजू (आंध्र प्रदेश) येथे खासगी बसचा अपघात होऊन अनेक जीव गेल्यामुळे खूप हादरून गेलो आहे. हे हृदयद्रावक आहे. मी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बाधितांना देण्यात येत असलेल्या मदतीची माहिती घेतली आहे. जखमींना चांगली वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मी दिले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+