अक्षयतृतीया 2025: 100 वर्षांनी आले 'हे'2 राजयोग, 40 वर्षांनी 3 ग्रहांची युती; कुणासाठी कशी फायदेशीर?
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा एक संपूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता कोणतेही शुभकार्य सुरू करता येते. यावर्षी अक्षय्य तृतीयेचा सण बुधवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची विशेष मान्यता आहे. असे मानले जाते की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यास व्यक्तीच्या जीवनावर देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 100 वर्षांनी गजकेशरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे.

१०० वर्षांनी आला योग
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 100 वर्षांनी गजकेशरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे दोन्ही राजयोग अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाच वेळी येणार असल्याने हा खूप मोठा संयोग समजला जात आहे. पंचमहापुरुष राजयोगाचे वैदिक ज्योतिषशास्त्रात तपशीलवार वर्णन केले आहे. जर हा राजयोग कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत असेल तर त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. माणसाला आयुष्यात नेहमीच आनंद मिळतो.
कोणते आहेत राजयोग?
यंदा अक्षय्य तृतीयेला गजकेशरी आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. गजकेसरी राजयोग चंद्र आणि गुरूच्या युतीने तयार होतो तर मालव्य राजयोग शुक्र ग्रहाच्या उच्च राशीत प्रवेश केल्यावर तयार होतो. हे दोन्ही राजयोग बुधवारी 30 एप्रिलला आहेत. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही राजयोग अतिशय शुभ मानले जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या दोन राजयोगांची निर्मिती झाल्यामुळे, येणारा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि अद्भुत असू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीयेला कोणत्या राशींना सर्वात जास्त लाभ होतील ते जाणून घेऊया.
४० वर्षांनंतर ग्रहांची अद्भुत युती
पंचांगानुसार, यावेळी अक्षय तृतीयेला ४० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि चंद्र या ३ ग्रहांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे. सूर्य देव मेष राशीत, चंद्र वृषभ राशीत आणि शुक्र मीन राशीत उच्च स्थानावर असेल. तसेच शास्त्रांनुसार अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्रावर आली तर ती शुभ मानली जाते. यामध्ये दुष्टांचा नाश होतो आणि शेतकऱ्यांना फायदा होतो. भाताचे पीक चांगले येते.
अक्षय तृतीया 2025 शुभ मुहूर्त
अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ लग्न पहाटे ४ ते ६:१९, सिंह लग्न सकाळी १०:५१ ते दुपारी १:०५, वृश्चिक लग्न संध्याकाळी ५:३४ ते ७:५१ आणि स्थिर कुंभ लग्न रात्री ११:४४ ते पहाटे १ पर्यंत आहे. या ४ शुभ मुहूर्तांमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य केले तर ते खूप फलदायी ठरेल. भविष्य पुराणात असे म्हटले आहे की, जे लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात, त्यांची संपत्ती आणि समृद्धी वाढते.












Click it and Unblock the Notifications