10 मिनिटं लेट, प्लाईट झाली मिस; पण उशीरा पोहोचणेच तिच्यासाठी जीवनदान ठरले, वाचा भूमी चौहानची कहाणी!
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 241 प्रवाशांचा जीव गेला आणि केवळ एक प्रवाशी वाचला. तर एकूण 265 मृतदेह सापडले आहेत. एकीकडे ही अतिशय दुर्दैवी व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली असताना. याच अपघातग्रस्त विमानाने प्रवास करणाऱ्यासाठी आलेल्या महिलेची दहा मिनीटाने प्लाईट मिस झाली होती.
ती विमानतळावरुन घराकडे जात होती, तेव्हाच पाच ते दहा मिनिटाने विमान अपघाताची बातमी तिने मोबाईलवर पाहिली आणि तिने देवाचे स्मरण केले. अन् आपण जर विमानाने गेलो असतो तर आपले काय झाले असते याचा विचारच तिच्या डोक्यात घोळू लागला. ही आपबीती सांगितली भूमी चौहान नावाच्या महिलेने. तीने माध्यमांशी संवाद साधताना देवाचे आभार मानले.

भूमी चौहान यांचे फ्लाईट दहा मिनिटांसाठी मिस झाले. त्यानंतर त्या हताश होऊन नशीबाला दोष देत असतानाच या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त त्यांना कळले. त्यावेळी भूमी चौहान अक्षरश: ढसाढसा रडायला लागल्या, मनाचा थरकाप उडाला.
#WATCH | Bhoomi Chauhan, a resident of Gujarat's Bharuch, missed yesterday's flight, AI-171, which crashed and 241 of 242 on board, including crew members, lost their lives.
— ANI (@ANI) June 13, 2025
Bhoomi Chauhan says, "...We arrived at the check-in gate 10 minutes late, but they didn't allow me, and I… pic.twitter.com/T1AqU9SSz0
ट्रॅफिकमुळे उशीर झाला अन् त्यांना जीवनदान मिळाले
त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मी सुदैवाने बचावले या मागे गणपती बाप्पाच मला पावले. विमानतळावर पोहचण्यासाठी ट्रॅफीकमुळे त्यांना दहा मिनिटे उशीरा झाला आणि प्रवासी बोर्डिंग पास एरियातून पुढे पोहचल होते. त्यामुळे त्यांचे विमान थोडक्यात मिस झाले. परंतू त्यामुळे त्यांना नवे जीवनदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नशीब कधी वळण घेईल हे सांगता येत नाही
नशिब कधी वळण घेईल हे कोणालाच माहिती नाही. अगदी लहानसा योगायोगही जीवन आणि मृत्यूचा निर्णय घेतो. काल झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात हेच दिसून आले. गुजरातमधील भरुच येथील रहिवासी भूमी चौहान या देखील या अपघातातून सुदैवाने वाचलेल्यांपैकी एक आहेत. कारण, त्यांना अपघात झालेल्या एअर इंडियाच्या त्याच विमानाने लंडनला जायचे होते. पण लेट झाल्याने प्लाईट मिस झाली.
भूमी यांनी सांगितले की अहमदाबादमध्ये प्रचंड वाहतुकीमुळे ती फ्लाइट चेक-इन गेटवर दहा मिनिटे उशिरा पोहोचले. ज्यामुळे तिला विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली नाही. उशिरा पोहोचणे तिच्यासाठी वरदान ठरले.
तथापि, इतर भूमीइतके भाग्यवान नव्हते. एक डॉक्टर जोडपे त्याच एअर इंडियाच्या विमानाने लंडनला जात होते. अपघाताच्या दुर्घटनेत त्यांची स्वप्ने संपली. त्याचप्रमाणे, एक 35 वर्षीय महिला तिच्या मुलीला तिच्या पालकांसोबत वडोदरा येथे सोडून लंडनला जात होती, परंतु ती तिच्या घरी परतू शकली नाही.
लंडनमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी उत्सुक असलेल्या दोन बहिणी देखील त्याच एअर इंडियाच्या विमानात होत्या ज्या पुन्हा कधीही दिसणार नाहीत. विमानात चढताना, त्या सर्वांना माहिती नव्हते की या विमानाचे लँडिंग अशा दुर्दैवी पद्धतीने होईल. त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी असे देखील आपण नेहमी म्हणत असतो, ते देखील सत्य आहे.












Click it and Unblock the Notifications