अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल धुरातुन जीव वाचवत खाली धावली, ब्लँकेट गुंडाळून वाचवला जीव

गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत एक भीषण आणि हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात अकोल्यातील ऐश्वर्या तोष्णीवाल नावाची तरुणी केवळ आश्चर्यकारक प्रसंगावधानामुळे वाचली आहे.

ahmedabad plane crash


ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. अपघाताच्या दिवशी ती कॉलेजच्या हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती.

भीषण आवाज, सर्वत्र धूर आणि मृत्यूच्या सावल्या

सकाळच्या सुमारास जोरदार आवाजाने ऐश्वर्याची झोपमोड झाली. खिडकीबाहेर पाहिल्यावर सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच तिने त्वरीत कृती केली. स्वतःभोवती चादर लपेटत धुरातून मार्ग काढत ती पाचव्या मजल्यावरून धावत खाली आली. हा निर्णय तिच्या जीव वाचवण्यामागे निर्णायक ठरला.

या सगळ्या काळात तिच्या हात-पायांवर आणि चेहऱ्यावर किरकोळ भाजल्याचे निशाण आढळले, परंतु गंभीर जखम टळली. ऐश्वर्याच्या या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुटुंब हादरले, पण देवाचे आभार मानले

अपघातानंतर ऐश्वर्याने आपल्या वडिलांना, अमोल तोष्णीवाल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्या वेळी ते अकोल्यातील आपल्या दुकानात होते.

मुलीचा थरथरता आवाज ऐकताच त्यांनी दुकान बंद केलं आणि थेट घरी गेले. घरातील वातावरण क्षणार्धात बदललं. घरच्यांनी टीव्हीवर बातम्या पाहिल्या आणि एक क्षणासाठी काळजाचं ठोको बंद झालं. पण जेव्हा समजलं की ऐश्वर्या वाचली आहे, तेव्हा कुटुंबीयांनी देवाचे शंभर वेळा आभार मानले.

आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी-आजोबांचे डोळे पाणावले होते. आजोबा म्हणाले, "पोती वाढदिवस साजरा करायला आली होती, पण अशा प्रसंगाला तिला सामोरं जावं लागेल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं."

ऐश्वर्याचा अनुभव: "हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील"

अपघाताच्या भीतीदायक क्षणांची आठवण करताना ऐश्वर्या म्हणते, "ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक घटना होती. अशा प्रकारच्या घडामोडी फक्त बातम्यांमध्ये पाहिल्या होत्या, पण स्वतः त्याचा भाग बनणं खूप धक्कादायक होतं. तो काळ मी कधीच विसरू शकणार नाही."

अपघातात 265 मृत्यू, महाराष्ट्रातीलही जीवितहानी

या विमान दुर्घटनेत एकूण 265 जणांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये विमानातील 241 प्रवासी आणि अपघातस्थळी असलेले 24 स्थानिक नागरिक होते. महाराष्ट्रातीलही 10 व्यक्तींचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये प्रमुख वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह, दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार यांचा समावेश आहे.

एक धाडसी बचाव आणि शोकांतिकेचं वास्तव

या दुर्घटनेत ऐश्वर्या तोष्णीवाल वाचली, ही बाब तिच्या कुटुंबीयांसाठी दिलासा देणारी असली, तरी शेकडो कुटुंबांसाठी हा काळ फार काळा ठरला आहे. ऐश्वर्याने केवळ प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला नाही, तर संकटाच्या काळातही आत्मसंयमाचं उदाहरण दिलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+